Download App

INS Vikrant : अभिमानास्पद! आयएनएस विक्रांतवर लढाऊ विमानाची लँडिंग

नवी दिल्ली : भारतीय नौदलाने (Indian Navy) ‘आत्मनिर्भर भारत’च्या दिशेने एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. नौदलाच्या वैमानिकांनी आयएनएस विक्रांतवर (INS Vikrant) लढाऊ विमान (LCA) लँडिंग केले आहे.

स्वदेशी लढाऊ विमाने आणि स्वदेशी विमानवाहू विमाने त्यांची रचना, बांधणी आणि ऑपरेट करण्याची भारताची क्षमता दर्शवतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबरमध्ये भारतातील पहिली स्वदेशी बनावटीची विमानवाहू वाहक आयएनएस विक्रांतची (IAC I) नियुक्ती केली.

भारताचे स्वदेशी बनावटीचे हलके लढाऊ विमान (LCA-Navy) आयएनएस विक्रांत या विमानवाहू जहाजावर उतरले. नौदलाने याला ऐतिहासिक मैलाचा दगड म्हणून वर्णन केले आहे.

याआधी नौदलाने म्हटले होते की, विमानवाहू युद्धनौका इंडो-पॅसिफिक क्षेत्रात शांतता आणि स्थैर्य सुनिश्चित करण्यासाठी भूमिका बजावू शकेल.

दरम्यान, पंतप्रधान मोदींनी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये कोची येथे देशातील पहिली स्वदेशी विमानवाहू जहाज आयएनएस विक्रांत देशाला समर्पित केली होती.

कोचीन शिपयार्ड येथे बांधण्यात आलेली ही विमानवाहू नौका तयार करण्यासाठी 20,000 कोटी रुपये खर्च आला. या जहाजाच्या अधिकृत समावेशामुळे नौदलाची ताकद दुप्पट होणार आहे.

Tags

follow us