LIC एजंटनाही मिळणार ग्रॅच्युइटी अन् पेन्शन; मोदी सरकारने केली मोठी घोषणा

LIC Agent : LIC एजंट आणि कर्मचाऱ्यांसाठी आज केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडून मोठी घोषणा केली आहे. LIC एजंट आणि कर्मचाऱ्यांसाठी कौटुंबिक पेन्शन, मुदत विमा संरक्षणासह ग्रॅच्युईटी मर्यादा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे LIC एजंटसह कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. 👉 Ministry of Finance @FinMinIndia approves welfare measures for LIC agents and employees […]

Nirmala Sitaraman

Nirmala Sitaraman

LIC Agent : LIC एजंट आणि कर्मचाऱ्यांसाठी आज केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडून मोठी घोषणा केली आहे. LIC एजंट आणि कर्मचाऱ्यांसाठी कौटुंबिक पेन्शन, मुदत विमा संरक्षणासह ग्रॅच्युईटी मर्यादा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे LIC एजंटसह कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (LIC) चे एजंट आणि कर्मचाऱ्यांच्या हितासाठी केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडून बड्या घोषणा करण्यात आल्या आहेत. यामध्ये 2017 च्या कायद्यात सुधारणा करुन LIC च्या कर्मचाऱ्यांसह एजंटला कौटुंबिक पेन्शन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

भाजप पुन्हा सत्तेत आल्यास देशात रशियासारखी हुकूमशाही येईल; पृथ्वीराज चव्हाण यांचा घणाघात

अर्थ मंत्रालयाने कोणत्या घोषणा केल्या?
LIC एजंटसाठी अगोदर ग्रॅच्युईटीची मर्यादा 3 लाख रुपये होती, आता ही मर्यादा 2 लाख रुपयांनी वाढवण्यात आली असून ही मर्यादा 5 लाखांपर्यंत नेण्यात आली आहे. तसेच LIC एजंटच्या विमा संरक्षण मुदतीत वाढ करण्यात आली आहे.

Thalapathy Vijay Movie Poster: थलापती विजयच्या ‘लिओ’ सिनेमाचे पोस्टर प्रदर्शित

तर कर्मचाऱ्यांसाठी टर्म इन्शुरन्स कव्हर 10 हजारांवरुन 25 ते 1 लाख 50 हजारांपर्यंत वाढवण्यात आला आहे. मुदत विम्याची रक्कम वाढवल्यानंतर निधन झालेल्या एजंटच्या कुटुंबाला अर्थिक स्वरुपात मोठी मदत मिळणार आहे.

LIC कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना पेन्शनचा लाभ मिळू शकत नव्हता आता, कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला 30 टक्के समान दराने कौटुंबिक पेन्शन मिळू शकणार आहे. त्यामुळे आता कर्मचाऱ्याच्या निधनानंतर त्याच्या कुटुंबियांना पेन्शन स्वरुपात रक्कम मिळणार असल्याने कुटुंबालाही दिलासा मिळणार आहे.

दरम्यान, केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे देशभरातल्या जवळपास 13 लाखांपेक्षा जास्त LIC एजंट आणि 1 लाखांपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना लाभ होणार आहे.

Exit mobile version