सेबी प्रमुख माधबी पुरी आणखी गोत्यात; नव्या अहवालामुळे का उडाली खळबळ..

रॉयटर्सच्या अहवालात असे म्हटले आहे की सेबी प्रमुखांनी (SEBI) त्यांच्या कार्यकाळात सल्लागार कंपनीकडून उत्पन्न मिळवले होते.

Madhabi Puri

Madhabi Puri

SEBI Chief Madhabi Puri Buch : हिंडनबर्ग संस्थेच्या अहवालाने (Hindenburg Research Report) भारतात खळबळ उडाली होती. या अहवालात सेबीच्या अध्यक्षा माधबी पुरी बुच (Madhabi Puri Buch) यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते. आता याच माधवी पुरी बुच पुन्हा चर्चेत आल्या आहेत. रॉयटर्सच्या अहवालात असे म्हटले आहे की सेबी प्रमुखांनी (SEBI) त्यांच्या कार्यकाळात सल्लागार कंपनीकडून उत्पन्न मिळवले होते. जे नियमांचे उल्लंघन होते.

याआधी हिंडनबर्ग कंपनीने एक अहवाल प्रसिद्ध केला होता. यामध्ये माधबी पुरी बूच यांचे अदानी समुहाशी संबंध असल्याचे अनेक आरोप करण्यात आले होते. मागील वर्षीही हिंडनबर्गचा अहवाल आला होता. या अहवालाचा मोठा झटका अदानी उद्योग समुहाला बसला होता. अदानींच्या विविध कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली होती.

हिंडनबर्गच्या अहवालानंतर माधबी पुरी यांनी एक निवेदन प्रसिद्ध केले होते. अहवालातील सर्व आरोप त्यांनी फेटाळले होते. तसेच बदनामी करण्याच्या उद्देशाने अशा गोष्टी केल्या जात असल्याचेही त्यांनी सांगितले. सन 2017 मध्ये माधबी पुरी सेबीच्या सेवेत रुजू झाल्या होत्या. मार्च 2022 मध्ये त्यांना सेबीच्या प्रमुखपदी नियुक्ती मिळाली होती. रजिस्ट्रार ऑफ कंपनीजच्या कागदपत्रांनुसार अगोरा अॅडव्हायजरी प्रायव्हेट लिमिटेडने या वर्षात 3.71 कोटी रुपयांचा महसूल मिळवला. माधबी बुच यांची या कंपनीत जवळपास 99 टक्के भागीदारी आहे.

सर्वोच्च न्यायालयाकडून अदानींना मोठा दिलासा, हिंडनबर्ग प्रकरण SIT कडे सोपवण्यास स्पष्ट नकार

बुच यांनी सांगितले की कन्सल्टन्सी संस्थांची माहिती सेबीला दिली होती. त्यांच्या पतीने 2019 मध्ये सेवा निवृत्त झाल्यानंतर स्वतःच्या कन्सल्टिंग व्यवसायासाठी या संस्थांचा वापर केला होता. हिंडनबर्गने सिंगापूर कंपनीच्या रेकॉर्डचा हवाला देत स्पष्ट केले की मार्च 2022 मध्ये अगोरा पार्टनर्समधील सर्व शेअर्स माधबी पुरी बुच यांनी त्यांच्या पतीला ट्रान्सफर केले होते.

Exit mobile version