Download App

भाजपच्या पडद्यामागील चाणाक्याला काँग्रेसचा दणका; राहुल गांधींवरील व्हिडीओ अमित मालवीयांना महागात

FIR against Amit Malviya in Karnataka : भारतीय जनता पक्षाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांच्याविरोधात कर्नाटकमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर काँग्रेस नेते राहुल गांधी (rahul gandhi) यांच्याबद्दल आक्षेपार्ह व्हिडिओ पोस्ट केल्याचा आरोप आहे. काँग्रेस नेते रमेश बाबू यांच्या तक्रारीनंतर अमित मालवीय यांच्याविरुद्ध बेंगळुरूमधील हाय ग्राउंड्स पोलिस स्टेशनमध्ये विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

17 जून रोजी ट्विट केले
17 जून रोजी अमित मालवीय यांनी एक ट्विट केले होते. यासाठी त्यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता (IPC) च्या विविध कलम 153A, 120B, 505(2) आणि 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तेव्हापासून काँग्रेस आणि भाजप नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. या ट्विटवरून काँग्रेसने भाजपवर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. त्याचवेळी भाजप खासदार तेजस्वी सूर्या यांनी आरोप केला की, राजकीय सूडातून एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

Sunil Kendrakar Retirement | केंद्रेकरांनी स्वेच्छा सेवानिवृत्तीचा निर्णय का घेतला?

पवन खेडा यांचा हल्लाबोल
त्याचवेळी काँग्रेस नेते पवन खेडा म्हणाले की, ते केवळ सत्याशी खेळत नाही तर कोणाच्या तरी चारित्र्याशी खेळतात, प्रतिमेशी खेळतात आणि देशाची प्रतिमा डागाळण्यात कोणी हातभार लावला असेल तर तो सर्वात जास्त भाजपच्या आयटी सेलचा आहे. पंतप्रधानांचा संपूर्ण अमेरिका दौरा केवळ एका व्यक्तीने खराब केला, त्याचे नाव हे (अमित मालवीय) असल्याचे ते म्हणाले. मला आश्‍चर्य वाटत आहे की, सरकारने आजपर्यंत त्यांच्यावर एफआयआर का दाखल केला नाही.

Tags

follow us