Download App

राहुल गांधींच्या अडचणीत आणखी वाढ; परत एक गुन्हा दाखल

Case Against Rahul Gandhi :  काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या अडचणती पुन्हा एकदा वाढ झाली आहे. याआधी राहुल गांधी यांनी 2019 सालच्या निवडणुकीमध्ये मोदी समाजाविषयी आक्षेपार्ह शब्द वापरल्याने त्यांच्यावर केस दाखल करण्यात आली होती. यावरुन त्यांना न्यायालयाने 2 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. आता पुन्हा एकदा त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यानंतर आता स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बदनामी केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल गांधींच्या विरोधात पुण्यामध्ये तक्रार करण्यात आली आहे. राहुल गांधी यांनी केंब्रिज विद्यापीठात 28 फेब्रुवारी रोजी भाषण दिले होते त्यावेळी त्यांनी सावकरांविषयी आक्षेपार्ह विधान केले होते.

Akshay Kumar : 55 वर्षीय खिलाडीला शर्टलेस होऊन डान्स करणं पडलं महागात; व्हिडीओ पाहून चाहते भडकले

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू सत्यकी सावरकर यांनी राहुल गांधींच्या विरोधात पुणे न्यायालयामध्ये बदनामीचा खटला दाखल केला आहे. त्यामुळे राहुल गांधींच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. सावरकरांची प्रतिष्ठा खराब करण्याचा प्रयत्न राहुल गांधींनी केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

कुणाल कामरा यांनी मोदी सरकारच्या नव्या आयटी कायद्याला कोर्टात दिलं आव्हान; कोर्टाने सरकारला सुनावलं

तसेच दिल्लीतील तीस हजारी पोलिस स्टेशनमध्ये देखील राहुल गांधींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सावरकरांचा अपमान केल्याचा आरोप वकील रवींद्र गुप्ता यांनी केला आहे. राहुल गांधी यांनी परदेशी नागरिक आणि भारतातील नागरिकांमध्ये वैर निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचे देखील रवींद्र गुप्ता यांनी म्हटले आहे.

 

Tags

follow us