Download App

Udayanidhi Stalin : ‘सनातन’चा वाद पोलिसांत; स्टॅलिनविरुद्ध गुन्हा दाखल !

Udayanidhi Stalin : सनातन धर्माबद्दल केलेल वक्तव्य (Sanatan Dharma remark) तामिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन (Udayanidhi Stalin) यांना चांगले भोवण्याची चिन्हे दिसत आहेत. वकिलांनी तक्रार दाखल केल्यानंतर आता उदयनिधी स्टॅलिन आणि कर्नाटक सरकारमधील मंत्री प्रियांक खर्गे (Priyank Kharge) यांच्याविरोधात उत्तर प्रदेशातील रामपूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही मंत्र्यांविरोधात एका वकिलाने फिर्याद दिली होती. त्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे हे प्रकरण इतक्यात शांत होईल असे दिसत नाही.

Udhayanidhi Stalin : ‘सनातन’ वक्तव्यावर उदयनिधी स्टॅलिन ठाम; म्हणाले, ‘मी पुन्हा-पुन्हा..,’

उदयनिधी (Udayanidhi Stalin)आणि प्रियांक खर्गे यांच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 153 अ आणि 295 अ अंतर्गत गुन्ह दाखल करण्यात आला आहे. उदयनिधी स्टॅलिन तामिळनाडू सरकारमध्ये युवा कल्याण आणि खेळ वि विकास मंत्री आहेत. तर प्रियांक खर्गे कर्नाटकच्या सिद्धरामय्या सरकारमध्ये समाजकल्याण, आयटी आणि पर्यटन खात्याचे मंत्री आहेत.

तामिळनाडूचे मु्ख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन (Udayanidhi Stalin) आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे पुत्र प्रियांक खर्गे यांनी सनातन धर्मावर वक्तव्य केले होते. त्यामुळे धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर अधिवक्ता अॅड. राम सिंग लोधी, अधिवक्ता हर्ष गु्प्ता यांनी एसपींकडे पत्राद्वारे तक्रार दिली होती. त्यानंतर उदयनिधी स्टॅलिन आणि प्रियांक खर्गे यांच्याविरुद्ध धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत एफआयआर दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

काय म्हणाले होते उदयनिधी स्टॅलिन ?

सनातन हे संस्कृत नाव आहे. तर सनातन धर्म हा सामाजिक न्याय आणि समतेच्या विरोधात आहे. काही गोष्टींना विरोध करता येत नाही, त्या संपवल्या पाहिजेत. आम्ही डेंग्यू, डास, मलेरिया किंवा कोरोनाला विरोध करू शकत नाही. ते नष्टच करुन टाकायचा आहे. तसेच सनातनलाही नष्ट करायचे आहे, असे वादग्रस्त वक्तव्य उदयनिधी स्टॅलिन (Udayanidhi Stalin) यांनी तामिळनाडूतील एका कार्यक्रमात केले होते. या वक्तव्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती.  ठिकठिकाणी त्यांच्या या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. यानंतरही स्टॅलिन यांनी मात्र आपण आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचे म्हणाले होते.

Tags

follow us