Maha Kumbh 2025 : गेल्या एका महिन्यापासून सुरु असणाऱ्या महाकुंभातून (Maha Kumbh 2025) एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार, सेक्टर 19 मध्ये अनेक मंडपांना आग लागल्याने भाविकांमध्ये घबराट पसरली आहे. आगीची माहिती मिळताच दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी पोहोचल्या असून आग आटोक्याचा प्रयत्न करत आहे.
आगीनंतर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. आगीने अनेक मंडपांना वेढल्याचे वृत्त आहे. सध्या कोणत्याही जीवितहानीबद्दल वृत्त नाही. आगीचे कारण आणि नुकसानीचे प्रमाण अद्याप समजलेले नाही. शनिवारी महाकुंभातील सेक्टर 19 मध्ये अचानक आग लागली. ही आग कल्पवासींच्या रिकाम्या मंडपात लागली. धूर निघत असल्याचे पाहून भाविकांमध्ये गोंधळ उडाला. माहिती मिळताच स्थानिक प्रशासनाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी दलकम विभागाच्या कर्मचाऱ्यांना बोलावले.
On fire incident in Prayagraj Mela Kshetra, DIG Maha Kumbh, Vaibhav Krishna says, “Fire is completely under control. It broke out in some old tents vacated by Kalpvasis in Sector 19. No loss of life or injury to anyone.”#MahaKumbh2025
— ANI (@ANI) February 15, 2025
तर दुसरीकडे 13 फेब्रुवारी रोजीही महाकुंभाच्या परिसरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी आग लागली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी कसा तरी आग आटोक्यात आणली, पण तोपर्यंत चार तंबू जळून खाक झाले होते. आगीमुळे फारसे नुकसान झाले नाही. महाकुंभ मेळा परिसरातील सेक्टर सहामधील नागवासुकीजवळ बिंदू माधव मार्गावर एक पोलिस छावणी असल्याचे सांगण्यात आले, जिथे सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या राहण्यासाठी वेगळे तंबू बनवण्यात आले होते. गुरुवारी दुपारी अचानक एका तंबूला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली, ज्यामुळे तेथे गोंधळ उडाला.
मोठी बातमी! 1 एप्रिलपासून 19 धार्मिक स्थळांवरील दारूची दुकाने होणार बंद
या घटनेवर डीआयजी महाकुंभ काय म्हणाले?
प्रयागराज मेळा परिसरात लागलेल्या आगीच्या घटनेबाबत महाकुंभाचे डीआयजी वैभव कृष्णा म्हणाले की, आग पूर्णपणे नियंत्रणात आहे. सेक्टर 19 मध्ये कल्पवासींनी रिकामे केलेल्या काही जुन्या तंबूंना आग लागली. या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झालेली नाही.