First AI School In Kerala : आजच्या सुपरफास्ट तंत्रज्ञानाच्या जगातील मोठा अविष्कार म्हणजे AI (आर्टिफिशियल इंटेलिजन्स). या वेगळ्या धाटणीच्या अन् तितक्याच सुपरडुपर तंत्रज्ञानाचे अनेक चमत्कार आपल्या कानावर आले असतीलच. भूतकाळातील एखाद्या व्यक्तीचे चित्र रेखाटणे असो, आजारी रुग्णाला औषधे सांगणे असो, एखाद्या विषयावर निबंध लिहीणे असो की नॉलेजच्या महासागरात काही शोधून काढणं असो, या सगळ्या गोष्टी AI च्या मदतीने सोप्या वाटू लागल्या आहेत. या तंत्रज्ञानाच्या मदतीने माणसाची लाईफ, रोजची कामं, कार्यालयातील कामे सोपी झाली असली तरी हा ऑनलाइन मित्र अनेकांना शत्रूही वाटू लागला आहे. ते काहीही असू द्या पण, आज AI तंत्रज्ञान विविध क्षेत्रात वापरले जाऊ लागले आहे.
आता तर AI च्या कारनाम्याची बातमी भारतातूनच आली आहे. होय, दक्षिण भारतातील केरळ राज्यात पहिली AI शाळा सुरू करण्यात आली आहे. तिरुअनंतपूरम येथे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते या विद्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. ही शाळा आयलर्निंग इंजिन (आयएलई) युसएसए आणि वैदिक ईस्कूल यांच्या मदतीने सुरू करण्यात आली आहे. AI टूलच्या मदतीने शाळेतील अभ्यासक्रम, पर्सनलाइज्ड लर्निंग, मूल्यांकन आणि शिक्षणाच्या अन्य घटकांत या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे.
Chandrayan 3 : विक्रम लँडरमधून प्रग्यान रोव्हर बाहेर, ISRO कडून व्हिडिओ ट्वीट
जर तुम्ही असा विचार करत असाल की आता या शाळेत शिक्षकांचे काही काम नाही. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातूनच विद्यार्थ्यांना शिकवले जाईल तर घाबरू नका. तसे काहीच होणार नाही. ही पहिली AI शाळा अन्य शाळांसारखीच आहे. मग, या शाळेत वेगळं आहे तरी काय? या शाळेत विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या अनुभवात वाढ व्हावी यासाठी AI आणि अॅडव्हान्स्ड टेक्नॉलॉजिकल सिस्टीमची मदत घेण्यात येणार आहे.
AI स्कूल आयलर्निंग (ILE) अमेरिका आणि वैदिक ई स्कूल यांच्या सहकार्याने ही शाळा सुरू करण्यात आली आहे. म्हणजेच, आता देशात शिक्षणाचे एक नवे युग सुरू होणार आहे. या प्रकल्पात पूर्व मुख्य सचिव, डीजीपी आणि कुलपती यांच्यासारखे तज्ज्ञ काम करणार आहेत.
वैदिक ई स्कूलच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार एआय शाळा शिक्षणाचा एक नवीन दृष्टीकोन विकसित करणार आहे. जागतिक पातळीवरील शिक्षण देण्याच्या उद्देशानेही या तंत्रज्ञानाच्या ताकदीचा वापर करता येणार आहे. फक्त शाळेतील शिक्षणच नाही तर क्वालिटी लर्निंगचा फीलही देणार आहे.
चंद्रावर भारताचं ‘शिवशक्ती’ अन् ‘तिरंगा केंद्र’; Chandrayaan 3 उतरलेल्या जागेला मोदींनी दिलं नाव
या शाळेत सुरुवातीला आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना शिकवण्यात येणार आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणातील निकषांचाही आधार शाळेसाठी घेण्यात आला आहे. शाळेतील AI संचालित सुविधांमध्ये मल्टी टीचर रिवीजन सपोर्ट, मल्टीलेव्हल असेसमेंट, अॅप्टिट्यूड टेस्ट, साइकोमेट्रिक काउंसलिंग, करियर मॅपिंग, मेमरी टेक्निक, संचार आणि लेखन कौशल्य, इंटरव्यू अँड ग्रुप डिस्कशन, मॅथेमॅटिक्स स्किल, इमोशनल अँड मेंटल स्किल डेव्हलपमेंट यांचा समावेश आहे.
या व्यतिरिक्त AI स्कूल परीक्षा, जेईई, एनईईटी, एमटी, सीयूईटी, सीएलएटी, जी मॅट, जीआरई, आयईएलटीएस आणि अन्य प्रवेश परीक्षांसाठीही या शाळेत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.