चंद्रावर भारताचं ‘शिवशक्ती’ अन् ‘तिरंगा केंद्र’; Chandrayaan 3 उतरलेल्या जागेला मोदींनी दिलं नाव
PM Modi : चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान 3 चे (Chandrayaam 3) यशस्वी सॉफ्ट लँडिंग केल्यानंतर संपूर्ण जगातून भारतावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. दक्षिण ध्रुवावर चांद्रयान उतरवणारा भारत हा पहिला देश ठरला असून, यशस्वीपणे लँडिंग करण्याचा इतिहास रचण्याबरोबरच इस्त्रोने (ISRO) आणखी एक इतिहास रचला आहे. यानंतर इस्त्रोच्या या यशस्वी शास्त्रज्ञांना कौतुक अन् शाबासकीची थाप देण्यासाठी पंतप्रधान मोदी थेट बंगळुरूत दाखल झाले आहेत. इस्त्रोच्या शास्त्रज्ञांना भेटल्यानंतर मोदी भावूक झाले. त्यांनाही अश्रू अनावर झाल्याचे दिसून आले.
Chandrayan 3 : आपल्या खास स्टाईलमध्ये गुगलने सेलिब्रेट केलं भारताचं यश
मोदी यांनी येथे शास्त्रज्ञांचे तोंडभरून कौतुक केले तसेच त्यांनी येथे मोठी घोषणा केली. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ज्या ठिकाणी भारताचे चांद्रयान 3 उतरले. यान जिथं उतरलं त्याचं नामकरण करण्याचा निर्णय घेतला. त्या केंद्राला आता शिवशक्ती केंद्र या नावाने ओळखले जाईल. शिवात मानवतेच्या कल्याणाचा संकल्प आहे. आणि शक्तीतून आपल्याला त्या संकल्पाला साध्य करण्याची ताकद मिळते. यातून संपूर्ण भारत देशही जोडला जातो.
चांद्रयान 2 च्या ठिकाणाचं तिरंगा पॉइंट नामकरण
दुसरे नामकरण आहे. ज्यावेळी चांद्रयान 2 चंद्रावर पोहोचले होते. ज्या ठिकाणी ते उतरले पण अयशस्वी ठरले. त्यावेळी त्या जागेचं नामकरण करण्याचा विचार होता. पण त्यावेळच्या परिस्थितीमुळे ते शक्य झाले नाही. मात्र त्यावेळी असा संकल्प केला होता की ज्यावेळी चांद्रयान 3 चंद्रावर पोहोचेल त्यावेळी दोन्ही केंद्रांचे एकाच वेळी नामकरण करू. आता ती वेळ आली आहे. तिरंग्या व्यतिरिक्त दुसरे काय नाव असू शकते. तर चंद्रावर ज्या ठिकाणी चांद्रयान 2 ने आपले चिन्ह सोडले त्या जागेला आता तिरंगा पॉइंट या नावाने ओळखले जाईल, अशी घोषणा मोदी यांनी केली.
Explainer : चांद्रयान 3 चौदा दिवसांनंतर पृथ्वीवर परतणार? सामान्यांच्या डोक्यात प्रश्नांचं काहूर