Union Budget 2024 LIVE Update: नवी दिल्ली : केंद्रातील एनडीए सरकारचा तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प (Union Budget 2024) आज (23 जुलै) सादर होत आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) लोकसभेमध्ये अर्थसंकल्प सादर केला आहे. यात शेती, पायाभूत सुविधांसह अनेक गोष्टींबाबत मोठ मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. सीतारामन यांनी कुणासाठी काय घोषणा केल्या याबाबत सविस्तर माहिती देणार ब्लॉग…
स्टँडर्ड डिडक्शनची मर्यादा ५० हजारांवरून ७५ हजारांपर्यंत वाढवण्यात आली आहे. अर्थसंकल्पात करप्रणालीबाबत करण्यात आलेल्या घोषणांनुसार 3 ते 7 लाखांपर्यंत पाच टक्के आयकर, 12 ते 15 लाखांवर 20 टक्के तर, 15 लाखांपेक्षा जास्त उत्पन्नावर 30 टक्के आयकर द्यावा लागणार आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोबाईल आणि चार्जरवरील कस्टम ड्यूटी 15 टक्क्यांनी कमी करण्याची घोषणा केली आहे. यामुळे येत्या काळात मोबाईल आणि चार्जरच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे. याशिवाय कॅन्सरची तीन औषधे कस्टम ड्युटी फ्री करण्यात आल्याने याच्या किमती कमी होणार असल्याने रूग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. सोने आणि चांदीवरील कस्टम ड्यूटी 6 टक्क्यांनी कमी करण्याची घोषणा करण्यात आली आहे. तसेच लिथियमवरील कस्टम ड्यूटीदेखील कमी करण्यात आली आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहने आणखी स्वस्त होणार आहेत.
काय स्वस्त होणार?
मोबाईल हॅन्डसेट
मोबाईल चार्जर
कॅन्सरवरील औषधे
सोने आणि चांदीचे दागिणे
इलेक्ट्रिक वहाने
सोलार सेट
खाजगी क्षेत्राच्या सहकार्याने ई-कॉमर्स निर्यात केंद्र तयार केले जाणार
तरुणांच्या इंटर्नशिपसाठी सर्वसमावेशक योजना आणणार
5 वर्षात टॉप 500 कंपन्यांमध्ये 1 कोटी तरुणांना इंटर्नशिप
100 शहरांमध्ये औद्योगिक पार्क विकसित केले जातील.
MSME हमी योजनेअंतर्गत 100 कोटी रुपयांपर्यंतची कर्जे उपलब्ध होणार
MUDRA कर्ज मर्यादा 10 लाख रुपयांवरून 20 लाख रुपयांपर्यंत वाढवली
MSME ला मदत करण्यासाठी SIDBI शाखा वाढवणार
देशात उच्च शिक्षणासाठी 10 लाखांपर्यंत कर्ज देणार
दरवर्षी 25000 विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात 7.5 लाखांचे कर्ज
पहिल्या कामावर थेट EPFO खात्यात 15 हजार रुपये दिले जाणार
नोकरदार महिलांसाठी हॉस्टेल उभारण्यात येणार असून, अशा प्रकारच्या सुविधांमधून नोकरदार वर्गामध्ये महिलांची संख्या वाढण्यासाठी प्रोत्साहन दिलं जाईल. सर्वांगीण विकासासाठी नॅशनल कोऑपरेशन पॉलिसी राबवली जाणार आहे.
#Budget2024 | Finance Minister Nirmala Sitharaman says, "Working women hostels will be set up. Higher participation of women in workforce to be promoted through hostels and creches...Our government will bring National Cooperation Policy for overall development. Our government… pic.twitter.com/b1jK7Hl3oU
— ANI (@ANI) July 23, 2024
देशातील १ कोटी तरुणांना इन्टर्नशीप देण्यात येणार
टॉपच्या कंपन्यात इन्टर्नशीप देण्यात येणार
पुढच्या पाच वर्षांत १ कोटी तरुणांना देण्यात येणार इन्टर्नशीप
१२ महिन्यांच्या कालावधीसाठी दिली जाणार इन्टर्नशीप
इन्टर्नशीपच्या काळात तरुणांना अलाऊन्स म्हणून ५ हजार रुपये प्रतिमहिना मिळणार
वन टाईम असिस्टन्स म्हणून ६ हजार रुपये दिले जाणार
अर्थसंकल्पात पाटणा ते पुणे एक्सप्रेस वे ला मंजुरी देण्यात आली आहे. याशिवाय फेरीवाल्यांसाठी स्ट्रीट फूड हब तयार केले जाणार असून, निवडक शहरांमध्ये १०० स्ट्रीट फूड हब्जची योजना राबवली जाणार आहे. पंतप्रधान सौर यौजनेची घोषणा; एक कोटी लोकांना मोफत सौरउर्जा देण्याचा प्रयत्न. 100 शहरांमध्ये स्वच्छ पाणी योजना राबविण्याबरोबरच शहरातील गरिबांना घरासाठी 2.2 लाख कोटी रुपये देणार
महिला आणि मुलींना लाभ देणाऱ्या योजनांसाठी 3 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या 100 हून अधिक शाखा ईशान्येकडील भागात स्थापन केल्या जाणार आहेत. याशिवाय देशाची अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी पोलावरम सिंचन प्रकल्प पूर्ण केला जाणार आहे.
अर्थसंकल्पात घोषणा करताना सीतारामन यांनी सामान्यांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तीन कोटी घरे बांधली जातील अशी घोषणा केली आहे. ही घरे पीएम आवास योजनेअंतर्गत बांधली जाणार आहेत.