live now
Union Budget LIVE : स्टॅडर्ड डिडक्शन वाढवले; न्यू रिजीममध्ये किती भरावा लागणार टॅक्स
Union Budget 2024 Live Update: एनडीए सरकारचा तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प (Union Budget 2024) आज (23 जुलै) सादर होत आहे.
Union Budget 2024 LIVE Update: नवी दिल्ली : केंद्रातील एनडीए सरकारचा तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प (Union Budget 2024) आज (23 जुलै) सादर होत आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) लोकसभेमध्ये अर्थसंकल्प सादर केला आहे. यात शेती, पायाभूत सुविधांसह अनेक गोष्टींबाबत मोठ मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. सीतारामन यांनी कुणासाठी काय घोषणा केल्या याबाबत सविस्तर माहिती देणार ब्लॉग…
LIVE NEWS & UPDATES
-
अर्थसंकल्पात आयकरावर मोठी घोषणा, स्टॅडर्ड डिडक्शनची मर्यादा वाढवली
स्टँडर्ड डिडक्शनची मर्यादा ५० हजारांवरून ७५ हजारांपर्यंत वाढवण्यात आली आहे. अर्थसंकल्पात करप्रणालीबाबत करण्यात आलेल्या घोषणांनुसार 3 ते 7 लाखांपर्यंत पाच टक्के आयकर, 12 ते 15 लाखांवर 20 टक्के तर, 15 लाखांपेक्षा जास्त उत्पन्नावर 30 टक्के आयकर द्यावा लागणार आहे.
न्यू रिजीममध्ये कसा असेल टॅक्स स्लॅब
- 0-3 लाखांच्या उत्पनावर शून्य टक्के टॅक्स
- 3 ते 7 लाखांवर 5 टक्के टॅक्स
- 7 ते 10 लाखांवर 10 टक्के टॅक्स
- 10-12 लाखांच्या उत्पानावर 15 टक्के टॅक्स
- 12-15 लाखांच्या उत्पानावर 20 टक्के टॅक्स
- 15 लाखांपेक्षा अधिक उत्पानावर 30 टक्के टॅक्स
-
सोनं-चांदीवरील कस्टम ड्युटी घटवली
अर्थसंकल्प सादर करताना सीतारामन यांनी सोनं, चांदी व प्लॅटिनमवरीव कस्टम ड्युटी कमी करण्याची घोषणा केली आहे. सोने आणि चांदीसाठी 6 तर, प्लॅटिनमसाठी 6.5 टक्के कस्टम ड्युटी कमी करण्यात आल्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.
-
मोबाईल फोन-चार्जरसह तीन कॅन्सरची औषधे स्वस्त होणार
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोबाईल आणि चार्जरवरील कस्टम ड्यूटी 15 टक्क्यांनी कमी करण्याची घोषणा केली आहे. यामुळे येत्या काळात मोबाईल आणि चार्जरच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे. याशिवाय कॅन्सरची तीन औषधे कस्टम ड्युटी फ्री करण्यात आल्याने याच्या किमती कमी होणार असल्याने रूग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. सोने आणि चांदीवरील कस्टम ड्यूटी 6 टक्क्यांनी कमी करण्याची घोषणा करण्यात आली आहे. तसेच लिथियमवरील कस्टम ड्यूटीदेखील कमी करण्यात आली आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहने आणखी स्वस्त होणार आहेत.
काय स्वस्त होणार?
मोबाईल हॅन्डसेट
मोबाईल चार्जर
कॅन्सरवरील औषधे
सोने आणि चांदीचे दागिणे
इलेक्ट्रिक वहाने
सोलार सेट
-
बजेटमध्ये तरुणांसाठी काय?
खाजगी क्षेत्राच्या सहकार्याने ई-कॉमर्स निर्यात केंद्र तयार केले जाणार
तरुणांच्या इंटर्नशिपसाठी सर्वसमावेशक योजना आणणार
5 वर्षात टॉप 500 कंपन्यांमध्ये 1 कोटी तरुणांना इंटर्नशिप
100 शहरांमध्ये औद्योगिक पार्क विकसित केले जातील.
MSME हमी योजनेअंतर्गत 100 कोटी रुपयांपर्यंतची कर्जे उपलब्ध होणार
MUDRA कर्ज मर्यादा 10 लाख रुपयांवरून 20 लाख रुपयांपर्यंत वाढवली
MSME ला मदत करण्यासाठी SIDBI शाखा वाढवणार
देशात उच्च शिक्षणासाठी 10 लाखांपर्यंत कर्ज देणार
दरवर्षी 25000 विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात 7.5 लाखांचे कर्ज
पहिल्या कामावर थेट EPFO खात्यात 15 हजार रुपये दिले जाणार
-
नोकरदार महिलांसाठी हॉस्टेल उभारण्यात येणार
नोकरदार महिलांसाठी हॉस्टेल उभारण्यात येणार असून, अशा प्रकारच्या सुविधांमधून नोकरदार वर्गामध्ये महिलांची संख्या वाढण्यासाठी प्रोत्साहन दिलं जाईल. सर्वांगीण विकासासाठी नॅशनल कोऑपरेशन पॉलिसी राबवली जाणार आहे.
#Budget2024 | Finance Minister Nirmala Sitharaman says, "Working women hostels will be set up. Higher participation of women in workforce to be promoted through hostels and creches...Our government will bring National Cooperation Policy for overall development. Our government… pic.twitter.com/b1jK7Hl3oU
— ANI (@ANI) July 23, 2024
-
देशातील 1 कोटी तरुणांना दिली जाणार इन्टर्नशीप, 12 महिन्यांसाठी मिळणार इन्टर्नशीप
देशातील १ कोटी तरुणांना इन्टर्नशीप देण्यात येणार
टॉपच्या कंपन्यात इन्टर्नशीप देण्यात येणार
पुढच्या पाच वर्षांत १ कोटी तरुणांना देण्यात येणार इन्टर्नशीप
१२ महिन्यांच्या कालावधीसाठी दिली जाणार इन्टर्नशीप
इन्टर्नशीपच्या काळात तरुणांना अलाऊन्स म्हणून ५ हजार रुपये प्रतिमहिना मिळणार
वन टाईम असिस्टन्स म्हणून ६ हजार रुपये दिले जाणार
-
पाटणा ते पुणे एक्सप्रेस वे ला मंजुरी
अर्थसंकल्पात पाटणा ते पुणे एक्सप्रेस वे ला मंजुरी देण्यात आली आहे. याशिवाय फेरीवाल्यांसाठी स्ट्रीट फूड हब तयार केले जाणार असून, निवडक शहरांमध्ये १०० स्ट्रीट फूड हब्जची योजना राबवली जाणार आहे. पंतप्रधान सौर यौजनेची घोषणा; एक कोटी लोकांना मोफत सौरउर्जा देण्याचा प्रयत्न. 100 शहरांमध्ये स्वच्छ पाणी योजना राबविण्याबरोबरच शहरातील गरिबांना घरासाठी 2.2 लाख कोटी रुपये देणार
-
महिला आणि मुलींच्या योजनांसाठी 3 लाख कोटींची तरतूद
महिला आणि मुलींना लाभ देणाऱ्या योजनांसाठी 3 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या 100 हून अधिक शाखा ईशान्येकडील भागात स्थापन केल्या जाणार आहेत. याशिवाय देशाची अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी पोलावरम सिंचन प्रकल्प पूर्ण केला जाणार आहे.
-
सामान्यांच्या घरांसाठी मोठी घोषणा
अर्थसंकल्पात घोषणा करताना सीतारामन यांनी सामान्यांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तीन कोटी घरे बांधली जातील अशी घोषणा केली आहे. ही घरे पीएम आवास योजनेअंतर्गत बांधली जाणार आहेत.
-
१२ इंडस्ट्रियल पार्क उभारण्यात येणार...
देशभरात 12 इंडस्ट्रियल पार्कला नॅशनल इंडस्ट्रियल कॉरिडॉर डेव्हलपमेंट प्रोग्रॅमअंतर्गत मंजुरी देण्यात आली आहे.
-
एक लाखांच्या पगारावर सरकार देणार 3 हजार
तुमच्या पहिल्या नोकरीत एक महिन्याचा भत्ता दिला जाणार याशिवाय, 1 लाख रुपयांच्या पगारावर सरकार पीएफमध्ये 3000 रुपये देणार.
-
रस्ते बांधणीसाठी 26 हजार कोटी
देशभरात रस्तेबांधणीसाठी २६ हजार कोटींचा खर्च केला जाईल – निर्मला सीतारमण
-
आंध्रला अतिरिक्त आर्थिक मदतीची घोषणा
निर्मला सीतारामन यांनी त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात आंध्र प्रदेशला अतिरिक्त आर्थिक मदत जाहीर करण्यात आली असून, आंध्र प्रदेशला अतिरिक्त 50 हजार कोटी रुपये दिले जाणार आहेत.
-
अर्थसंकल्पीय भाषणात निर्मला सीतारामन यांच्या मोठ्या घोषणा
- मोफत रेशनची व्यवस्था ५ वर्षे सुरू राहील.
- यावर्षी कृषी आणि संलग्न क्षेत्रांसाठी 1.52 लाख कोटी रुपयांची तरतूद.
- रोजगारासाठी सरकार 3 मोठ्या योजनांवर काम करणार आहे.
- बिहारमध्ये 3 एक्सप्रेसवेची घोषणा.
- बोधगया-वैशाली द्रुतगती मार्ग बांधला जाईल.
- पाटणा-पूर्णिया एक्स्प्रेस वेचे बांधकाम.
- बक्सरमध्ये गंगा नदीवर दुपदरी पूल.
- बिहारमध्ये एक्सप्रेस वेसाठी 26 हजार कोटींची तरतूद.
- विद्यार्थ्यांना 7.5 लाख रुपयांचे स्किल मॉडेल कर्ज.
- नोकऱ्यांमध्ये महिलांना प्राधान्य
-
उच्च शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य
शैक्षणिक कर्जाबाबत घोषणा करताना सीतारामन यांनी "देशांतर्गत संस्थांमधील उच्च शिक्षणासाठी 10 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी सरकार आर्थिक सहाय्य देईल असे सांगितले.
बजट 2024 | शिक्षा ऋण पर वित्त मंत्री निर्मला सीतारमण ने कहा, "सरकार घरेलू संस्थानों में उच्च शिक्षा के लिए 10 लाख रुपये तक के ऋण के लिए वित्तीय सहायता प्रदान करेगी।" pic.twitter.com/jzCJaAb79i
— ANI_HindiNews (@AHindinews) July 23, 2024
-
तरुणांसाठी 5 नवीन योजना जाहीर
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना तरूणांसाठी 5 नव्या योजनांची घोषणा केली आहे. सीतारामन म्हणाल्या की, 2 लाख कोटी रुपयांच्या केंद्रीय खर्चासह 5 वर्षांतील 4.1 कोटी तरुणांना रोजगार, कौशल्ये आणि इतर संधी उपलब्ध करून देण्यासाठी 5 योजना जाहीर केल्या जात आहेत. यावर्षी आम्ही शिक्षण, रोजगार आणि कौशल्यांसाठी 1.48 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचेही सीतारामन यांनी सांगितले.
-
निर्मला सीतारामन यांच्या अर्थसंकल्पीय भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
- हा अर्थसंकल्प सर्वांच्या विकासाचा असून, विकसित भारताचा रोडमॅप आहे. ऊर्जा सुरक्षेवर सरकारचे लक्ष असून, रोजगार वाढवण्यावर सरकारचा भर आहे. रोजगार वाढवणे ही सरकारची प्राथमिकता आहे. याशिवाय नैसर्गिक शेती वाढवण्यावर भर देण्यात येणार आहे.
-
अर्थसंकल्प LIVE बघा फक्त लेट्सअप मराठीवर
देशाचा अर्थसंकल्प लेट्सअप मराठीवर LIVE बघता येणार आहे.
-
किसान सन्मान निधी 8 हजारांवर? निर्मलाताई शेतकऱ्यांचे वर्ष गोड करण्याची शक्यता
माध्यमांमधील वृत्तांनुसार, एनडीए सरकार अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज देऊ शकते. यात किसान सन्मान निधीची रक्कम सहा हजार रुपयांवरुन आठ हजार रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. याशिवाय खतांवरील जीएसटीबाबतही मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे.
-
निर्मला सीतारामन यांच्या अर्थसंकल्पात नोकरदार वर्गासाठी काय असू शकते?
मूडीज ॲनालिटिक्सच्या मते, मध्यमवर्गीयांसाठी, नोकरदार वर्गासाठी आणि पगारदारांसाठी अर्थसंकल्पात काहीतरी चांगले असू शकते. यात आयकरचा स्लॅब चेंज किंवा आणखी काही महत्वाची बातमी असू शकते.
-
सर्वाधिकवेळा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या अर्थमंत्री; सीतारामन यांनी मोडित काढला मोरारजी देसाईंचा विक्रम
आज निर्मला सीतारामन या सातव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यानंतर त्या या सर्वाधिकवेळा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या अर्थमंत्री म्हणून ओळखल्या जातील. यासोबतच सहा अर्थसंकल्प सादर करण्याचा मोरारजी देसाई यांचा विक्रमही त्या मोडित काढतील.
-
निर्मला सीतारामन राष्ट्रपतींच्या भेटीसाठी रवाना
अर्थमंत्री निर्मला सीतारामन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेण्यासाठी राष्ट्रपती भवनाकडे रवाना
#WATCH | Finance Minister Nirmala Sitharaman heads to Rashtrapati Bhavan to call on President Murmu, ahead of Budget presentation at 11am in Parliament pic.twitter.com/V4premP8lL
— ANI (@ANI) July 23, 2024
-
बजेटदिवशी सेन्सेक्सचा ग्रीन सिग्नल : 229.89 अंकांनी वाढून 80,731.97 वर सुरुवात
बजेटदिवशी शेअर बाजारामध्ये चांगली सुरुवात झाली आहे. सेन्सेक्स 229.89 अंकांनी वाढून, 80,731.97 वर ट्रेंड करत आहे.
Sensex opens in green; currently up by 229.89 points, trending at 80,731.97 on the day of the Union Budget presentation. pic.twitter.com/dpYf8xf8iN
— ANI (@ANI) July 23, 2024