Download App

Tripura BJP Candidate List: त्रिपुरात भाजप उमेदवारांची पहिली यादी जाहीर; माजी मुख्यमंत्र्याचा पत्ता कट

  • Written By: Last Updated:

नवी दिल्ली :त्रिपुरा विधानसभा निवडणुकीसाठी (Tripura Assembly Elections) 16 फेब्रुवारीला मतदान होत आहे.भाजपने आपल्या उमेदवारांची पहिली यादी (BJP Candidate List) जाहीर केली आहे. यामध्ये 48 जागांचा समावेश असून माजी मुख्यंमंत्र्याचा पत्ता कट केला आहे.

पहिल्या यादीत माजी मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब (CM Biplab Kumar Deb) यांचे तिकिट कापले गेल्याच्या वृत्ताला पुष्टी मिळाली आहे. त्यांच्या बनमालीपूर जागेवरून उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. या जागेवरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष राजीव भट्टाचार्य निवडणूक लढवत आहेत.

यातच मुख्यमंत्री डॉ. माणिक साहा यांना बोरदोवली विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. या यादीत केंद्रीय मंत्री प्रतिमा भौमिक यांच्या नावाचाही समावेश आहे. त्यांना धानपूर मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.

भाजपवर सतत मुस्लिम उमेदवारांना तिकीट न देण्याचा आरोप होत आला आहे. यावरून अनेकदा विरोधकांनी भाजपला लक्ष देखील केलं आहे. मात्र आगामी त्रिपुरा विधानसभा निवडणुकीत भाजपच्या पहिल्या यादीत दोन मुस्लिम उमेदवारांचाही समावेश आहे. तफजल हुसेन यांना बॉक्सनगरमधून तिकीट देण्यात आले आहे. तसेच कैलाशहरमधून मोहम्मद मोबेशर अली यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या दोन उमेदवारांना तिकीट दिल्याने याची देशभरात चर्चा होत आहे.

निवडणूक आयोगाने 18 जानेवारी रोजी त्रिपुरातील 60 जागांच्या विधानसभेच्या तारखा जाहीर केल्या. राज्यात 16 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. 2 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. त्रिपुरा विधानसभेचा कार्यकाळ 22 मार्च रोजी संपत आहे. त्रिपुरा निवडणुकीसाठी 21 जानेवारी रोजी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. नामांकनाची अंतिम तारीख 30 जानेवारी आहे. 2 फेब्रुवारीपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत.

Tags

follow us