Modi Government : केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात सुरु आहे. या फेरबदलात महाराष्ट्रातून शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांना देखील संधी मिळणार असल्याची चर्चा सुरु आहे. तर आता आणखी एक मोठी बातमी समोर येत आहे. माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल. मुरुगन यांनी मंगळवारी केंद्रीय मंत्रिमंडळ आणि राज्यसभा सदस्यत्व या दोन्ही पदांचा राजीनामा दिला आहे. पक्षसंघटना बळकट करण्यासाठी राज्यात काम करण्याची इच्छा त्यांच्याकडून व्यक्त करण्यात आली आहे. या राजीनाम्यानंतर मंत्रिमंडळात आणखी एक जागा रिक्त झाल्याने या महिन्यात मंत्रिमंडळाचा विस्तार आणि फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर दुसरीकडे आतापर्यंत याबाबत भाजपकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
पाच नवीन मंत्र्यांचा समावेश ?
मंत्रिमंडळातून जॉर्ज कुरियन (George Kurian) यांनी यापूर्वीच राजीनामा दिला आहे. तर राज्यसभा खासदार रवनीत सिंग बिट्टू (Ravneet Singh Bittu) यांनीही जुलैमध्ये राजीनामा दिला होता. तर दुसरीकडे केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी (Hardeep Singh Puri) यांनी पुन्हा राज्यसभेसाठी संधी न मिळाल्याने त्यांना देखील मंत्रिमंडळातून राजीनामा द्यावा लागणार आहे. तसेच ग्राहक व्यवहार राज्यमंत्री बी.एल. वर्मा यांनाही राज्यसभेच्या निवडणुकीसाठी पुन्हा उमेदवारी देण्यात आलेली नाही. मंत्रिमंडळात होणाऱ्या फेरबदलात महाराष्ट्रातून शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.
तमिळनाडूमध्ये काम करण्याची इच्छा – एल. मुरुगन
माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल. मुरुगन (l. Murugan) त्यांचे राजीनामा पत्र ‘एक्स’ वर पोस्ट केले. पत्रात त्यांनी लिहिले, “गेल्या पाच वर्षांत आपल्या सरकारमध्ये सेवा करण्याचा जो सन्मान मला मिळाला, त्याबद्दल मी अत्यंत कृतज्ञता व्यक्त करतो. एका रोजंदारी मजुराच्या मुलावर आपण जो विश्वास दाखवला, तो माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा बहुमान राहील. आता माझ्या लोकांमध्ये आणि पक्ष कार्यकर्त्यांमध्ये अथक परिश्रम करून त्या विश्वासाला सार्थ ठरवण्यासाठी मी आपल्या आशीर्वादाची अपेक्षा करतो.”
मकर राशीसह ‘या’ 5 राशींना आज होणार आर्थिक लाभ-
मुरुगन हे सप्टेंबर 2018 पासून राज्यसभेचे सदस्य आहेत आणि एप्रिल 2024 मध्ये मध्य प्रदेशातून राज्यसभेसाठी त्यांची पुन्हा निवड झाली होती. त्यांचा कार्यकाळ एप्रिल 2023 मध्ये संपणार आहे. मुरुगन यांनी पीटीआय (PTI) ला सांगितले, मी पंतप्रधानांना विनंती केली आहे की मला मंत्रिमंडळ आणि राज्यसभेतील जबाबदाऱ्यांमधून मुक्त करावे, कारण मला तमिळनाडूमध्ये जाऊन पक्ष बळकट करायचा आहे. त्यांनी पुढे सांगितले, पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात मी नमूद केले आहे की, पक्ष बळकट करण्यासाठी आणि 2029 च्या लोकसभा निवडणुकांसाठी पायाभरणी करण्याच्या उद्देशाने मला गावे, विविध वस्त्या आणि इतर सर्व भागांचा दौरा करायचा आहे.
