नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या 195 उमेदवारांची पहिली यादी आज (2 फेब्रुवारी) जाहीर करण्यात आली. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) पुन्हा वाराणसीमधूनच (Varanasi) निवडणूक लढविणार आहेत. याशिवाय लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, 34 केंद्रीय मंत्री यांनाही या पहिल्या यादीतून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. (for the upcoming Lok Sabha elections, the first list of 195 candidates of the ruling Bharatiya Janata Party at the Center was announced)
29 फरवरी को प्रधानमंत्री श्री @narendramodi जी की गरिमामयी उपस्थिति में और श्री जेपी नड्डा जी की अध्यक्षता में केंद्रीय चुनाव समिति की बैठक का आयोजन किया गया था।
बैठक के दौरान 16 राज्य और दो केंद्र शासित प्रदेश के 195 सीटों के लिए बीजेपी उम्मीदवार के नामों मंजूरी दी गई।… pic.twitter.com/54N6tZxt8T
— BJP (@BJP4India) March 2, 2024
आज भाजपच्या मुख्य कार्यालयात भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी या नावाची घोषणा केली. 195 उमेदवारांमध्ये उत्तर प्रदेशमधील 51, पश्चिम बंगाल 20, मध्य प्रदेश 24, गुजरात 15, राजस्थान 15, केरल 12, तेलंगणा – 9, आसाम – 11, झारखंड – 11, छत्तीसगड – 11 दिल्ली – 5, जम्मू कश्मीर – 2, उत्तरराखंड 3, अरुणाचल प्रदेश 2, गोवा 1, त्रिपुरा 1 आणि अंदमान निकोबार 1 अशा विविध राज्यांमधील नावांचा समावेश आहे. या यादीमध्ये 28 महिला आणि 47 युवा नेत्यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
We're set to announce candidates on 51 seats from Uttar Pradesh, 20 from West Bengal, 24 from Madhya Pradesh, 15 each from Gujarat and Rajasthan, 12 from Kerala, 9 seats from Telangana, 11 from Assam, 11 each from Jharkhand and Chhattisgarh, 5 from Delhi, 2 from J&K, 3 from… pic.twitter.com/hUa5jyOjng
— BJP (@BJP4India) March 2, 2024
मात्र पहिल्या यादीतून महाराष्ट्रातील एकाही जागेवरील उमेदवाराची घोषणा झालेली नाही. कदाचित दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्र आणि उर्वरित राज्यांतील नावांची घोषणा होऊ शकते. मात्र महाराष्ट्रासारखे महत्वाचे राज्य वगळल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. आजच्या यादीतील आणखी एक महत्वाची आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे महाराष्ट्रातील उमेदवारांची घोषणा न झाल्याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाही पहिल्या यादीतून डच्चू मिळाला आहे. केंद्रातील एकूण 34 मंत्र्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यात जवळपास सर्व वरिष्ठ मंत्र्यांच्या नावांचा समावेश आहे.
अमित शहा, राजनाथ सिंह, मनसुख मांडविय अशा वरिष्ठ नेत्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. नितीन गडकरी यांनाही एक वरिष्ठ नेते, मंत्री मानले जाते. ते भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहिले आहेत. मात्र त्यांना पहिल्या यादीत स्थान न दिल्याने अनेक तर्कवितर्क लढविले जाण्याची शक्यता आहे. गडकरी हे अत्यंत स्पष्टवक्ते मानले जातात. ते अनेकदा आपल्या सरकारवरही टीका करताना मागे पुढे बघत नाहीत. याचाही गडकरी यांना फटका बसला आहे का? की महाराष्ट्रातील युतीच्या जागा वाटपाचा वादच अद्याप मिटलेला नाही त्यामुळे त्यांची उमेदवारी मागे ठेण्यात आली आहे का? असे सवाल विचारले जात आहेत.