G20 Summit Photo: सध्या देशाची राजधानी दिल्लीत G20 शिखर परिषद (G20 Summit) सुरू आहे. या परिषदेत अनेक जागतिक नेते सहभागी झाले आहेत. या परिषदेत अनेक महत्त्वाचे करार केले जाणार आहेत. काल सायंकाळी भारत मंडपमच्या लेव्हल 3 मध्ये डिनर पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. राज्य प्रमुखांच्या डिनरमध्ये खास, स्वादिष्ट पदार्थ होते. या डिनरच्या वेळी परदेशी पाहुणे पारंपारिक पोशाखात दिसले होते.
G20मध्ये सहभागी झालेल्या विविध देशांच्या प्रतिनिधींच्या पत्नींनी साड्या नेसल्या होत्या. मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंदा जगन्नात यांची पत्नी कविता यांनी हिरवी साडी नेसली होती. तर जपानी पंतप्रधान फुमियो किशीदा यांच्या पत्नी युको यांनी पिवळी साडी नेसली होती. G20 परिषदेसाठी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीन ह्या देखील आपली कन्या सायमा जावेद यांच्यासोबत आल्या होत्या. शेख हसीना यांच्याशी भेट झाल्यानंतर बायडेन यांना त्यांच्यासोबत सेल्फी काढण्याचा मोहर आवरला नाही. जो बायडेन यांनीशेख हसीना आणि त्यांची मुलगी सायमा यांच्यासोबत सेल्फी घेतला.
मोठी बातमी! कोपर्डी प्रकरणातील मुख्य दोषीची येरवडा कारागृहात आत्महत्या
जेवणासाठी भारत मंडपात पोहोचलेल्या पाहुण्यांचे नालंदा विद्यापीठाच्या पार्श्वभूमीवर स्वागत करण्यात आले. पंतप्रधान मोदींनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि त्यांची पत्नी अक्षता यांना नालंदा विद्यापीठाचा इतिहास सांगितला. या डिनरनंतर ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी पंतप्रधान मोदींसोबत सेल्फी घेतला.
डिनरमध्ये राज्यांचे प्रमुख, प्रतिनिधी, भारतातील अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रीय आणि राज्यमंत्र्यांसह सुमारे 300 लोक उपस्थित होते. राज्यप्रमुखाच्या डिनरमध्ये खास, स्वादिष्ट आणि अप्रतिम पदार्थ होते. यामध्ये काश्मिरी कहवा, दार्जिलिंग चहा, मुंबई पाव, अंजीर-पीच मुरब्बा यासह देशातील अनेक प्रसिद्ध पदार्थांचा समावेश होता.
इकोनॉमिक कॉरिडरची घोषणा
काल पहिल्याच दिवशी भारताला मोठे यश मिळाले. या परिषदेत नवी दिल्ली G2 लीडर्स कॉन्फरन्सचा जाहीरनामा एकमताने मंजूर करण्यात आला. शिवाय, या परिषदेच्या व्यासपीठावरून भारत-मध्य-पूर्व-युरोप-कनेक्टिव्हीटी इकोनॉमिक कॉरिडरची ऐतिहासिक घोषणा करण्यात आली.
आफ्रिकन युनियन आता G20 कौन्सिलचा स्थायी सदस्य असेल, अशी घोषणा पंतप्रधान मोदींनी केली आहे.