Deepak Hooda and Sweety Bura Clash : भारताचा माजी कबड्डी कर्णधार दीपक हुड्डा व वर्ल्ड चॅम्पियन बॉक्सर स्वीटी बुरा यांनी एकमेकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दीपक हुड्डा व स्वीटी बूरा हे पती पत्नी आहेत. (Deepak Hooda) स्वीटीने पती दिपकवर मारहाणीचा आरोप केला आहे. दीपकच्या कुटुंबाने जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही दावा स्वीटीने केला. त्याचबरोबर दीपकने १ कोटी रूपये आणि फॉर्च्यूनरची मागणी केल्याचं स्वीटीने सांगितलं. या प्रकरणी आता दोघांनीही पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे.
वर्ल्ड बॉक्स स्वीटी बुराने आपल्या सोसश मीडिया हॅंडलवरून दीपकसोबतचे फोटो डिलीट केले असून तिने आता घटस्फोटाची याचिका कोर्टात दाखल केली आहे. पोलिसांकडून दीपकला चौकशीसाठी बोलवण्यात आले होते, पण तो हजर राहू शकला नाही. तर, दीपक हुड्डानेही आता स्वीटी बुराविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. स्वीटी बूराचे आई वडील व्याजावर पैसे मागत मला फसवत राहिले. हिसारमध्ये त्यांनी सेक्टर १-४ प्लॉट खरेदी केले होते. फसवणुकीतून ते फ्लॅट माझ्या आणि स्वीटीच्या नावे केले, असा दावा कबड्डीपटूने केला आहे.
अलीकडेच स्वीटी बूराला अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तर दीपक हुड्डाला २०२० साली अर्जुन पुरस्कार मिळाला होता. ७ जुलै २०२२ रोजी कबड्डीपटू दीपक हुड्डा व वर्ल्ड चॅम्पियन बॉक्सर स्वीटी बुराचे लग्न झाले.माझ्या लग्नासाठी आई वडिलांनी १ कोटीहन अधिक खर्च केला आणि दीपक आणि त्याच्या बहिणीने माझ्याकडे फॉर्च्यूनर गाडी मागितली. खेळ सोडण्याचा दबावही आणला. २०२४ च्या हरियणात निवडणुकीत पतीने मला १ कोटी रूपये आणण्यास सांगितले. ऑक्टोबर २०२४ मध्ये मारहाण करून मला घरातून बाहेर काढले असा आरोप स्वीटी बूराने केला आहे.
२०१५ साली मॅरेथॉनमध्ये मुख्य अतिथी म्हणून आलेले असताना दोघांमध्ये मैत्री झाली.मैत्रीचं रुपांतर प्रेमात झाले अन् २०२२ मध्ये या दोघांनी लग्न केले. लग्नानंतरही दोघांनी आपापला खेळ सुरू ठेवला. स्वीटी बूरा लग्नानंतर बॉक्सिंमध्ये जागतिक चॅम्पियन झाली. तर २०२४ मध्ये दीपक हुड्डाने महम विधानसभा मतदारसंघातून भाजपाकडून निवडणूक लढली पण त्याला पराभव स्वीकारावा लागला. स्वीटी बुरालाही बरवाला येथून निवडणूक लढवायची होती. पण त्यांना भाजपाकडून तिकिट मिळाले नाही. स्वीटी बुराने घटस्फोट घेण्यासाठी पोटगी म्हणून ५० लाख आणि दीड लाख महिना मासिक खर्च देण्याची मागणी कोर्टात