कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते बी.एस. येडियुरप्पा (Karnatak) यांच्याविरुद्ध लैंगिक अत्याचाराची तक्रार दाखल करणारी महिला आता हयात नाही. तिचा मुलगा खटला लढत आहे. 14 मार्च 2024 रोजी पीडितेच्या आईच्या आरोपांनंतर, येडियुरप्पा यांच्याविरुद्ध पॉक्सो गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला, परंतु 26 मे 2024 रोजी पीडितेच्या आईचा फुफ्फुसाच्या कर्करोगावर उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. हे प्रकरण अत्यंत हायप्रोफाइल होते.
कर्नाटकातील काँग्रेस सरकारने तपास सीआयडीकडे सोपवला. तपास यंत्रणेने येडियुरप्पा यांच्यासह चार आरोपींविरुद्ध 750 पानांचे आरोपपत्र दाखल केलं आहे. या आरोपांमध्ये लैंगिक अत्याचार, पुरावे नष्ट करणं आणि दडपशाहीचा समावेश आहे. गुप्त व्हिडिओ, सीसीटीव्ही फुटेज आणि पुरावे म्हणून मिळालेल्या जबाबांच्या आधारे एजन्सी सत्य उलगडण्याचा प्रयत्न करत आहे. 13 नोव्हेंबर रोजी कर्नाटक उच्च न्यायालयाने येडियुरप्पा यांच्याविरुद्धची पॉक्सो खटला रद्द करण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली. आता उद्या 2 डिसेंबर रोजी बेंगळुरू न्यायालयाने येडियुरप्पा यांच्यासह चारही आरोपींना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
येडियुरप्पा यांच्या वकिलांनी सांगितलं की महिलेचे म्हणणं खोटं आहे. येडियुरप्पा यांचं प्रतिनिधित्व करणारे वरिष्ठ वकील सी.व्ही. नागेश यांचे मते हा खटला राजकीयदृष्ट्या प्रेरित आहे आणि दुसऱ्या पक्षाच्या तक्रारी खोट्या आहेत. पीडिता आणि तिची आई फेब्रुवारीमध्ये अनेक वेळा पोलीस आयुक्तांना भेटली होती. परंतु, त्यांनी येडियुरप्पा आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरुद्ध कोणतेही आरोप केले नाहीत. महिलेने प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओबाबत, येडियुरप्पा यांनी न्यायालयात स्पष्ट केलं की तिला भेटायचे होते पण परवानगी नाकारण्यात आली.
मला माझ्या मर्यादा माहिती असल्याने, मुख्यमंत्री पदाच्या वादावर डी. कें शिवकुमारांचं मोठं विधान
यामुळे व्यथित होऊन ती मोठ्याने रडू लागली, म्हणून तिला घरात येऊ दिले. शिवाय, तिचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकले. दरम्यान, पोक्सो प्रकरणातील मुख्य तक्रारदाराचा एफआयआर दाखल केल्यानंतर एक महिन्याने मृत्यू झाला. आता, तिचा 26 वर्षीय मुलगा, पीडितेचा भाऊ, खटला लढत आहे. त्याने आता उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. येडियुरप्पांविरुद्ध पुरावे गोळा करण्यात तो सीआयडीला पूर्ण सहकार्य करत आहे. त्याने सीसीटीव्ही फुटेज, फोन मेमरी कार्ड आणि हार्ड ड्राइव्हसह प्रकरणाशी संबंधित सर्व डिजिटल साहित्य गोळा करून तपास यंत्रणेला सादर केले आहे.
पीडिताच्या भावाने सोशल मीडियावर need4justice नावाचे पेज तयार केले आहे. त्याने प्रकरणाशी संबंधित दोन व्हिडिओ अपलोड केले आहेत आणि आपल्या बहिणीला न्याय देण्याची मागणी केली आहे. व्हिडिओमध्ये तो म्हणाला, ‘मी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांना माझ्या बहिणीला न्याय मिळवून देण्याची विनंती करतो. आमच्या केसचे प्रतिनिधित्व करण्यासाठी एका चांगल्या वरिष्ठ वकिलाची नियुक्ती करण्याची मी तुम्हाला विनंती करतो.
मी बी.एस. येडियुरप्पा यांना चांगला माणूस मानत होतो, पण त्यांनी माझ्या मुलीशी अन्याय केला. मी माझ्या 17 वर्षांच्या बलात्कार पीडित मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांच्या घरी गेलो. आमचं संभाषण ऐकल्यानंतर, त्यांनी माझ्या मुलीला एका खोलीत नेलं आणि तिचा विनयभंग केला. माझी मुलगी कशी तरी त्यांच्यापासून पळून जाण्यात यशस्वी झाली आणि भीतीने थरथर कापत माझ्याकडं आली. येडियुरप्पा आणि या कृत्यात त्यांना पाठिंबा देणाऱ्यांना लवकरात लवकर अटक करावी अशी माझी इच्छा आहे.
