Download App

अखेर भाजपच्या ‘त्या’ माजी उपमुख्यमंत्र्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

karnataka elections 2023 : गेल्या काही दिवसांपासून नाराज असलेले भाजप नेते आणि कर्नाटकचे माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी (Laxman Sawadi) यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला. कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डीके शिवकुमार (DK Shivakumar) आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या (Siddaramaiah) यांची बेंगळुरूमध्ये भेट घेतल्यानंतर ही घोषणा करण्यात आली. लक्ष्मण सवदी यांना अथणी मतदारसंघातून तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा आणि भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.

“कोणतीही अट नाही. आपला अपमान झाला आहे असे त्यांना वाटते. अशा दिग्गज नेत्यांना काँग्रेस पक्षात घेणे हे आपले कर्तव्य आहे. भाजपमधील 9-10 पेक्षा जास्त विद्यमान आमदार आहेत ज्यांना आमच्यात सामील व्हायचे आहे परंतु आमच्याकडे त्यांना सामावून घेण्यासाठी जागा नाही,” असे डीके शिवकुमार यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांना धनुष्यबाण पेलवण्याच्या क्षमतेवर नारायण राणेंना शंका

भाजप नेते आणि माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांचे समर्थक असलेले विद्यमान आमदार महेश कुमथल्ली यांना बेळगाव जिल्ह्यातील अथणीतून तिकीट देण्यात आले. कुमथल्ली हे जारकीहोळी यांच्यासह काँग्रेसमधून भाजपात पक्षांतर करणाऱ्या आमदारांपैकी होते. 2019 मध्ये बीएस येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखाली भाजपला कॉंग्रेस-जेडीएस सरकार पाडण्यास आणिसत्ता स्थापन करण्यास मदत केली होती. मात्र, 2018 च्या निवडणुकीत काँग्रेसचे तत्कालीन उमेदवार महेश कुमथल्ली यांच्याकडून लक्ष्मण सवदी यांचा पराभव झाला होता.

Tags

follow us