Download App

खळबळजनक! कर्नाटकचे माजी डीजीपी ओम प्रकाश यांचा मृत्यू, पत्नीनेच खून केल्याचा संशय

Former Karnataka DGP Om Prakash Found Dead At Bengaluru : बेंगळुरूमधून (Bengaluru) एक खळबळजनक प्रकरण समोर आलंय. कर्नाटकचे माजी पोलिस महासंचालक (डीजीपी) ओम प्रकाश रविवारी त्यांच्या राहत्या घरी रहस्यमय परिस्थितीत मृतावस्थेत (Former Karnataka DGP Om Prakash ) आढळले. 1981 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी ओम प्रकाश (Karnataka) यांचा मृतदेह बेंगळुरूतील एचएसआर लेआउट येथील त्यांच्या निवासस्थानी आढळला.

प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकराच्या डोक्यात सैतान… भररस्त्यात तरूणीवर गोळ्या झाडल्या, कुठे घडलं?

अहवालानुसार, त्यांच्या शरीरावर अनेक जखमांच्या खुणा आढळून आल्या आहेत, ज्यामुळे त्यांची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय. माजी डीजीपींच्या मृत्यूमध्ये त्यांच्या जवळच्या कुटुंबातील सदस्याचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय. दरम्यान, त्यांच्या मृत्यूची बातमी मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. त्यांच्या मृत्यूची अधिक चौकशी सुरू आहे.

एक वाटी आमरस अन् मोदक खाण्यासाठी दीड कोटी, शेतकऱ्यांना 1 रूपयाही नाही; राजू शेट्टी आक्रमक

पोलिसांकडून अद्याप कोणतेही स्पष्ट अधिकृत माहिती मिळाली नाही. 1981 च्या बॅचचे 68 वर्षीय आयपीएस अधिकारी ओम प्रकाश हे मूळचे बिहारमधील चंपारण जिल्ह्यातील रहिवासी होते. त्याने एम.एस्सी भूगर्भशास्त्रात केले होते. तर 1 मार्च 2015  रोजी त्यांची कर्नाटकच्या डीजीपी म्हणून नियुक्ती झाली. याआधी त्यांनी अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा आणि गृहरक्षक विभागातही महत्त्वाची पदे भूषवली होती.

प्राथमिक तपासानुसार, प्रकाश यांची हत्या त्यांच्या पत्नी पल्लवी यांनी केल्याचं सांगितलं जातंय. त्यांच्या शरीरावर पोलिसांना चाकूने वार केल्याचे आढळले. तीन मजली घराच्या तळमजल्यावर रक्ताच्या थारोळ्यात प्रकाश यांचा मृतदेह आढळला. या घटनेसंदर्भात पोलिसांनी प्रकाश यांच्या पत्नी आणि मुलीची चौकशी सुरू केली आहे.

डीजीपींनी यापूर्वी काही जवळच्या संपर्कांना त्यांच्या जीवाला धोका असल्याची चिंता व्यक्त केली होती. अधिकाऱ्यांना संशय आहे की, या घटनेत कुटुंबातील एखाद्या सदस्याचा सहभाग असू शकतो. त्यांचा मृतदेह शवविच्छेदन तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आला आहे, तर एचएसआर लेआउट पोलीस अधिक तपास करण्यासाठी घटनास्थळी आहेत. 2015 ते 2017 पर्यंत राज्य डीजीपी पद भूषवणाऱ्या आयपीएस अधिकाऱ्याच्या अचानक मृत्यूमुळे त्यांच्या ओळखीच्या लोकांना मोठा धक्का बसला आहे.

 

follow us