एक वाटी आमरस अन् मोदक खाण्यासाठी दीड कोटी, शेतकऱ्यांना 1 रूपयाही नाही; राजू शेट्टी आक्रमक

एक वाटी आमरस अन् मोदक खाण्यासाठी दीड कोटी, शेतकऱ्यांना 1 रूपयाही नाही; राजू शेट्टी आक्रमक

Raju Shetty Criticized Mahayuti : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी अजितदादांवर (Ajit Pawar) हल्लाबोल केलाय. आज त्यांची नाशिकमध्ये पत्रकार परिषद पार पडली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून महायुती सरकारवर (Mahayuti) हल्लाबोल केलाय. राजू शेट्टी यांनी म्हटलंय की, हेच सर्व प्रश्न घेऊन नाशिकमध्ये दोन दिवस दौरा काढला (Maharashtra Politics) आहे. मंत्रालयात आम्ही कांदे घेऊन आंदोलन केले. आम्ही सगळे तुरुंगात गेलो. उशिरा पण सरकारला शहाणपण आले. कांद्याचे निर्यात शुल्क रद्द केले. वेळेवर कांदा निर्यात शुल्क रद्द न केल्याने भाव पडले, ही जबाबदारी सरकारची आहे.

1500 रूपये सरसकट हमी भाव सरकारने द्यावा, आमचा नाफेडवर भरोसा नाही अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे. परभणी जिल्ह्यात दीड लाखाच्या कर्जासाठी शेतकऱ्याने आत्महत्या केली. त्याच रात्री त्याच्या पत्नीने पण आत्महत्या केली. त्या महिलेच्या पोटात 7 महिन्याचे गर्भ होते. सुनील तटकरे (Sunil Takkare) यांच्या घरी एक वाटी आमरस आणि एक मोदक खायला जाण्यासाठी दीड कोटी खर्च करून तिथे हॉलिपेट बनवले. सरकारला लाज वाटत नाही. हजारो कोटी तिकडे खर्च करता आणि शेतकऱ्यांसाठी एक रुपयाही देत नाही अशी टीका त्यांनी केलीय.

उद्धव ठाकरे मनसैनिकांची माफी मागणार का? संदीप देशपाडेंचा थेट सवाल…

महायुती सरकारने कर्ज माफीची निवडणुकींपूर्वी घोषणा केली होती, त्याचं काय झालं? सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मदत होत नाही. अजित पवार हे स्वतःला शिस्तप्रिय नेते समजतात, पण त्यांना सरकारच्या तिजोरीची परिस्थिती माहिती असताना, या घोषणा का केल्या? असा सवाल देखील राजू शेट्टी यांनी केलाय. महायुती सरकारने घोषणा केल्याप्रमाणे सातबारा उतारा कोरा करावा. नाशिक जिल्हा मध्यवर्तीय सहकारी बँकमध्ये शेतकरी अवलंबून आहे. त्यावर शेतकरी यांना थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्ज देत नाही. 2 लाख 40 हजार शेतकऱ्यांची संख्या आहे. हे शेतकरी यांना थकबाकीदार असल्याने कर्ज मिळत नाही, त्यांना सावकारी आणि इतर बँकेकडून कर्ज घ्यावं लागत.

हिंदी सक्ती नकोच; मनसेचं थेट मोहन भागवतांना पत्र

सरकारने नाशिक जिल्हा बँकेला भाव-भांडवल दिले, तर शेतकऱ्यांना मदत होईल. बँक पूर्वपदावर येईल. सरकारने आमदारांच्या सुरक्षेसाठी 1 हजार कोटी रुपये खर्च केले. हे वळू इतके दिवस पोसले. ही आकडेवारी जाहीर करावी. शेतकऱ्यांसाठी सरकारकडे पैसे नाही. मायक्रो बँक 18 टक्क्यांनी कर्ज देते. ह्या गुंड्याना आम्ही दणका देणार. 15 दिवसांत आम्ही तुम्हाला दाखवू. सरकारने जिल्हा बँकेला उसने पैसे दिले, तरी बँक जिवंत होईल. 635 कोटीची मदत झाली, तर नाशिकची बँक पूर्वपदावर येईल, असं देखील राजू शेट्टी यांनी स्पष्ट केलंय.

एवढ्या आपत्ती येऊन विमा कंपन्यांनी 50 हजार कोटी रुपये कमवले. हा मोठा घोटाळा होण्यामागे सरकार जबाबदार आहे. आम्ही आंदोलन केले म्हणून विम्याचे पैसे मिळाले.
राज्यात 50 हजार कोटी रुपयांचा नफा या कंपन्यांनी कमवले. विमा योजनेची खरी परिस्थिती समोर आली. मागच्या काळात खोटं रेकॉर्ट करून पिक विमा काढला, अधिकारी निलंबित केले. त्यावर काही कारवाई नाही. याचा अर्थ सरकार यांना पाठीशी घालत आहे. वाहन अपघातात खर्च देतो, तशी भरपाई शेतकऱ्यांना दिली पाहिजे, ही मागणी असल्याचं राजू शेट्टी यांनी म्हटलंय.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube