Download App

“दादी को गोली मार दी..,’ आजीच्या हत्येचा प्रसंग सांगतांना राहुल गांधी भावूक होऊन म्हणाले…

श्रीनगर : काँग्रेसचे नेते राहुल गांधी (rahul gandhi) यांच्या भारत जोडो यात्रेचा (Bharat Jodo Yatra) आज श्रीनगर येथे समारोप होत आहे. आज सकाळपासून काश्मीरमध्ये बर्फवृष्टी सुरु असून बर्फवृष्टीत काँग्रेसची (Congress) समारोप सभा सुरु आहे. यावेळी राहुल गांधी यांनी आपल्या संपूर्ण यात्रेचा सार सांगटी होते. द्वेष, तिरस्कार, हिंसेच्या विरोधात ही यात्रा होती. प्रेम, बंधुभाव वाढावा, याकरिता भारत जोडो यात्रेचे प्रयत्न केले असल्याचे ते यावेळी म्हणाले. त्यांनी काश्मिरच्या लोकांच्या भावनेला हात घालत आपली आजी इंदिरा गांधी आणि वडील राजीव गांधी यांची हत्या झाल्यावर आपल्या मनावर काय परिणाम झाला, याची माहिती देण्याचा प्रयत्न केला.

आज ज्यांच्या घरातले सैनिक शहीद होतात, काश्मिरमधील लोक जेव्हा स्वतःच्या घरातले जवळचे लोक गमावतात, तेव्हा त्यांची मनस्थिती काय होत असनार ? हे मी आणि माझी बहीण चांगल्यारितीने समजू शकतो, कारण आम्ही दोघपण या अश्या गंभीर परिस्थितीतून गेलो असल्याचे राहुल गांधी म्हणाले. मी १४ वर्षांचा होतो. शाळेत असताना मला एक शिक्षक बोलवायला आले होते. त्यांनी सांगितले की, मला मुख्याध्यपकांनी बोलावलं आहे. मला वाटलं मुख्याध्यापकांनी बोलावलं म्हणजे माझी काहीतरी तक्रार झाली असणार आहे. कारण मी शाळेत असताना खूप मस्ती करायचो. पण या शिक्षकाच्या देहबोलीवरुन मला काहीतरी विचित्र झाल्याचा भास झाला.

मुख्याध्यापकांच्या केबिनमध्ये गेल्यावर ते म्हणाले, ‘राहुल तुझ्या घरून फोन आला, तेव्हा देखील मला जाणवलं की काहीतरी विचित्र घडलेलं आहे. मी फोन कानाला लावला. पलीकडून आई बोलत होती. तिच्याबरोबर आमच्या घरात काम करणारी एक महिला देखील बाजूला होती. तिचा आवाज मला स्पष्टपणे ऐकू येत होता. ती ओरडत होती, दादी को गोली मार दी, दादी को गोली मार दी…”, हा प्रसंग मी ऐकताच शांत झालो, हे सांगत असताना राहुल गांधी खूपच भावूक झाल्याचे दिसून आले. आपल्या देशात सैन्याच्या पालकांना अनेकदा एक फोन येतो. हजारो काश्मिरी लोकांना फोन आला असणार आहे. तसाच एक फोन मला आला. माझ्या वडीलांच्या एका मित्राने मला फोन केला होता. ते म्हणाले, राहुल एक वाईट बातमी आहे. पप्पाचे निधन झाले. मी म्हणालो, मला कळलं. धन्यवाद.

मला या प्रसंगातून हेच सांगायचे आहे की, आरएसएस, मोदीजी, डोभाल हे हिंसा घडविणारे लोक या दुःखाला समजू शकणार नाही. मी या दुःखाला समजू शकतो. पुलवामाच्या सैनिकांच्या मुलांच्या मनात काय घालमेल झाली असणार आहे, ती समजू शकतो. काश्मिरच्या लोक जेव्हा स्वतःचे नातेवाईक गमावतात, तेव्हा त्यांचे दुःख मी आणि माझी बहीण चागंलंच समजू शकतो. हे जो फोन येतात, आणि तेव्हा आपला जवळीक असलेला व्यक्ती गेल्याचे सांगत असतात. ते कुठे तरी थांबण्यात यावे, असे माझे धैर्य आहे. तेच भारत जोडो यात्रेचं उद्दिष्ट होत. भाजप- आरएसएसचे लोक मला शिव्या घालत आहेत. मी त्यांना धन्यवाद देतो. द्वेषाच्या बाजारामध्ये मी प्रेमाचे दुकान उघडण्याचा प्रयत्न करत, या यात्रेच्या माध्यमातून केला असल्याचे सांगून राहुल गांधी यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.

Tags

follow us