Download App

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची प्रकृती खालावली, एम्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल

Former PM Manmohan Singh यांना उपचारासाठी दिल्लीतील एम्स ( AIIMS hospital) रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे.

  • Written By: Last Updated:

Former PM Manmohan Singh admitted to AIIMS hospital: माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग (Former PM Manmohan Singh) यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना गुरुवारी रात्री उपचारासाठी दिल्लीतील एम्स ( AIIMS hospital) रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. पीटीआयने असे वृत्त दिले आहे. मनमोहन सिंग हे 92 वर्षांचे आहेत. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

दरम्यान, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, खासदार प्रियांका गांधी हे एम्स हॉस्पिटलला दाखल झाले आहेत. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हेही बेंगळुरूवरून दिल्लीकडे रवाना झाले आहेत. काँग्रेस पक्ष पूर्वनियोजित सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत.

यूपीए सरकारच्या 2004 ते 2014 या काळात ते पंतप्रधान होते. ते तब्बल 33 वर्षे राज्यसभेचे होते. गेल्या वर्षीत ते राज्यसभा सदस्य म्हणून निवृत्त झाले होते. ते 1991 मध्ये राज्यसभेचे सदस्य झाले. जून 1991 मध्ये पीव्ही नरसिंह राव यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये त्यांनी अर्थमंत्री म्हणून शपथ घेतली. पाच वेळा राज्यसभा सदस्य म्हणून आसामचे प्रतिनिधित्व केले. 2019 मध्ये ते राजस्थानमधून राज्यसभेवर गेले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोटाबंदीच्या निर्णयावर मनमोहन सिंग यांनी जोरदार टीका केली होती. नोटाबंधीचा निर्णयाला संघटित लूट आणि कायदेशीर लूट असे मनमोहन सिंग यांनी म्हटले होते.

26 सप्टेंबर रोजी जन्मलेले, पंजाबमध्ये 1932 मध्ये, सिंघ्याला त्याचे बॅचलर आणि मास्टर्स इन मिळाले पंजाब विद्यापीठातून अनुक्रमे 1952 आणि 1954 मध्ये अर्थशास्त्र. डॉ. मनमोहन सिंग यांनी 1957 मध्ये केंब्रिज विद्यापीठातून त्यांचे इकॉनॉमिक ट्रायपॉस पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी 1962 मध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठातून अर्थशास्त्रात डी.फिल केले. 1971 मध्ये भारत सरकारमध्ये वाणिज्य मंत्रालयात आर्थिक सल्लागार म्हणून रुजू झाले. डॉ. मनमोहन सिंग यांना लवकरच 1972 मध्ये वित्त मंत्रालयात मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून पदोन्नती देण्यात आली.

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या सरकारमध्ये त्यांनी 1985 ते 1987 या काळात भारतीय नियोजन आयोगाचे प्रमुख पदही भूषवले होते. त्यांनी संयुक्त राष्ट्रांमध्येही काम केले. याशिवाय ते 1982 ते 1985 या काळात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (RBI) गव्हर्नरही होते. या काळात त्यांनी बँकिंग क्षेत्रात अनेक सुधारणा केल्या. ज्यासाठी त्यांची आजही आठवण येते.

follow us