Download App

Bindeshwar Pathak Passed Away : सुलभ इंटरनॅशनलचे बिंदेश्वर पाठक यांचं निधन!

सुलभ इंटरनॅशनलचे संस्थापक बिंदेश्वर पाठक(Bindeshwar Pathak) यांचं निधन झालं आहे. अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. ते 80 वर्षांचे होते.

‘मी तर अजितदादांच्या स्वागतासाठी बुके घेतला होता’; राजकीय अतिक्रमणाच्या चर्चांना देसाईंचा फुलस्टॉप!

बिंदेश्वर पाठक यांनी देशात स्वच्छता मोहिमेत मोठं योगदान दिलं आहे. 1970 च्या काळात पाठक यांनी सुलभ इंटरनॅश्ल सोशल सर्व्हिस संस्थेची स्थापना केली. त्यानंतर देशभरात सुलभ इंटरनॅशनलची 8 हजार 500 शौचालये आणि स्नानगृहे आहेत. सुलभ इंटरनॅशनलचे टॉयलेट वापरण्यासाठी 5 रुपये आणि आंघोळीसाठी 10 रुपये आकारले जातात. तर अनेक ठिकाणी ते सामुदायिक वापरासाठीही मोफत ठेवण्यात आले आहेत.

‘Subhedar’ सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख पुन्हा बदलली, कारण सांगत चिन्मय मांडलेकर म्हणाला…

बिंदेश्वर पाठक आज स्वातंत्र्यदिनानिमित्त कार्यालयात ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात आले होते. ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागलं. त्यानंतर पाठक यांना तत्काळ एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं आहे. पाठक यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केलायं.

BDD chawl redevelopment : काही लोकांना चांगलं काम होताना पोटदुखी; आदित्य ठाकरेंचा मनसेवर हल्लाबोल

पाठक यांनी देशभरात राष्ट्रव्यापी स्वच्छता चळवळ उभी केली. त्यासाठी त्यांना पाच दशकांपेक्षाही अधिक काळ लागला होता. त्यासाठी त्यांनी आपल आयुष्य खर्च केलं आहे. त्यांच्या योगदानाने लाखो गंभीर वंचित गरीबांच्या जीवनात महत्त्वपूर्ण बदल घडवून आणले ज्यांना शौचालये परवडत नाहीत.

दरम्यान, डॉ. बिंदेश्वर पाठक यांनी महात्मा गांधींना आपले प्रेरणास्थान मानले होते. स्वच्छतेच्या चळवळीत त्यांनी सफाई कर्मचाऱ्यांच्या मानवी हक्कासाठी लढा दिला होता. सफाई कर्मचाऱ्यांचं पुनर्वसन, त्यांना सन्मानाने जीवन जगण्यासाठी प्रयत्न करणे, त्यांच्या कार्याचे उद्दिष्ट होते.

Tags

follow us