BDD chawl redevelopment : काही लोकांना चांगलं काम होताना पोटदुखी; आदित्य ठाकरेंचा मनसेवर हल्लाबोल

BDD chawl redevelopment : काही लोकांना चांगलं काम होताना पोटदुखी; आदित्य ठाकरेंचा मनसेवर हल्लाबोल

BDD chawl redevelopment : मुंबईमधील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाला आज शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray)यांनी भेट दिली. त्यावेळी त्यांनी या भागात सुरु असलेल्या इमारतीच्या कामाची पाहणी केली. त्याचवेळी आदित्य ठाकरेंनी मनसेवरही जोरदार निशाणा साधला. मनसेकडून (MNS)या ठिकाणच्या पार्किंगच्या मुद्द्यावरुन काही आरोप केले, त्यावर आदित्य ठाकरेंनी काही लोकांना चांगलं काम होत असताना पोटदुखी होते त्यांच्याकडे लक्ष देऊ नका असे म्हणत जोरदार हल्लाबोल केला.

Independence Day : 400 सरपंच, 250 शेतकरी अन् मच्छिमार.., स्वातंत्र्य उत्सवात लाल किल्ल्यावर विशेष पाहुणे असणार

या इमारतीचं काम 25 व्या मजल्यापर्यंत पूर्ण झाले आहे, त्याचबरोबर 2023 अखेरपर्यंत या इमारतीचे संपूर्ण काम पूर्ण होईल असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. या इमारतीचे भूमीपूजन उद्धव ठाकरे यांनी केले होते. पहिल्या फेजमध्ये आपण अडीच ते पावणेतीन लाख लोकांना घरं देऊ शकणार आहोत.

CM Eknath shinde आजारी असल्याचे सांगून अजितदादांना मुख्यमंत्री बनवण्याचा भाजपचा डाव

त्याचबरोबर या ठिकाणी काम सुरु असताना मनसेकडून पार्किंगच्या मुद्द्यावरुन विरोध केला जात असल्याचे पत्रकारांनी आदित्य ठाकरेंना विचारले, त्यावर ते म्हणाले की, काही लोकांना चांगले काम सुरु असताना पोटदुखी होत असते. त्यांच्याकडे फार लक्ष देऊ नका. जनता आमच्यासोबत आहे, या प्रकल्पासोबत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube