Download App

Manipur : दोन विद्यार्थ्य्यांच्या हत्येप्रकरणी चौघांना अटक, आरोपींना फाशी द्या; CM यांची मागणी

  • Written By: Last Updated:

Manipur News : काही दिवसांपूर्वी मणिपूरमध्ये (Manipur ) महिलांना विवस्त्र केल्याचा व्हिडिओ समोर आला होता. यानंतर जुलै महिन्यात मणिपूरमधून बेपत्ता झालेल्या दोन विद्यार्थ्यांच्या मृतदेहांची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत. दरम्यान, मणिपूरमध्ये दोन विद्यार्थ्यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयने रविवारी चार जणांना अटक केली. सीबीआयने (CBI) या आरोपींना चुराचांदपूर येथून अटक केली आहे. तपास यंत्रणेने सर्व आरोपींना आसाममधील गुवाहाटी येथे नेले आहे.

सध्या नारळ स्वस्त, कोणीही पोतंभर नारळ फोडा; श्रेयवादावरुन सुजय विखेंचा अजब सल्ला 

दरम्यान, विद्यार्थ्यांच्या हत्येप्रकरणी 6 आरोपींना अटक करण्यात आल्याचे वृत्त यापूर्वी आले होते. यापैकी 2 अल्पवयीन आहेत. मात्र नंतर मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, याप्रकरणी ४ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पाओमिनलुन हाओकिप, एस. मालस्वान हाओकीप, लिंग्रेइचोब बाइट आणि टिनूपिंग अशी अटक आरोपींची नावे असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

पुढे बोलताना मुख्यमंत्री सिंह म्हणाले की, फिजाम हेमनजी आणि हिजाम लिनथोइंगंबीच्या अपहरण आणि हत्या प्रकरणातील आरोपींना आज चुराचंदपूर येथून अटक करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांच्या हत्येप्रकरणी आरोपींना अटक करण्यात आली आहे. सरकार न्यायालयात या आरोपींना मृत्यूदंडाची शिक्षा देण्याची मागणी करेल.

मुख्यमंत्री सिंह म्हणाले, राज्यात अशांतता पसरवण्यात बाहेरील देशांचा हात आहे. या देशाच्या हस्तक्षेपामुळे मणिपूरमध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. एनआयएने सेमिनलुन गंगटेला अटक केली. यावरून मणिपूरमधील अशांततेमागे बाहेरील देशांचा हात असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करताना मुख्यमंत्री म्हणाले की, गुन्हेगार गुन्हा करून पळून जाऊ शकतो. पण कायद्याच्या कचाट्यातून सुटू शकत नाही. त्यांना फाशीची शिक्षा किंवा जास्तीत जास्त शिक्षा देण्यास सरकार कटिबद्ध आहे.

Tags

follow us