Download App

दिल्लीत ‘या’ दिवशी होणार इंडिया आघाडीची बैठक, जागावाटपावर चर्चाही होण्याची शक्यता

  • Written By: Last Updated:

INDIA Allience Meeting : गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू असलेल्या इंडिया (INDIA Allience) आघाडीच्या बैठकीची तारीख अखेर निश्चित झाली आहे. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश (Jairam Ramesh) यांनी दिलेल्या माहितीनुसार, इंडिया आघाडीची चौथी बैठक मंगळवारी (19 डिसेंबर) राजधानी दिल्लीत होणार आहे. छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थान विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या पराभवानंतरची ही पहिलीच बैठक आहे.

‘सरकार पडणार’ आदित्य ठाकरेंची बुद्धी भ्रष्ट झालीयं’; राधाकृष्ण विखेंचं प्रत्युत्तर 

पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांमुळे इंडिया आघाडीचे काम जवळपास ठप्प झाले होते. याचे मुख्य कारण म्हणजे इंडियातील प्रमुख पक्ष असलेल्या काँग्रेसचा निवडणुकांवर असलेला फोकस. त्यावरून बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनीही जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे इंडिया आघाडीत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि राजस्थानच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्याच्या दिवशी म्हणजे 6 डिसेंबरला काँग्रेसने बैठक बोलावली होती.

फडणवीस काड्या करत राहिले तर आम्ही डाव उधळणार; जरांगेंनी डायरेक्ट धमकावलंच 

मात्र, पूर्व नियोजित कार्यक्रमामुळं या बैठकीला उपस्थित राहता येणार नाही, असं बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी हे स्पष्ट केले होतं. त्यामुळं इंडिया आघाडीची बैठक पुढं ढकलण्यात आली होती. त्यानंतर काँग्रेसने इंडिया आघाडीतील पक्षांच्या प्रमुख नेत्यांची कॉन्स्टिट्युशन क्लबमध्ये 19 डिसेंबर रोजी दुपारी 2 वाजता बैठक घेण्याचा प्रस्ताव ठेवला होता. दरम्यान, संध्याकाळी उशिरा काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी सांगितले की, इंडिया आघाडीतील पक्षांच्या नेत्यांची चौथी बैठक मंगळवार, 19 डिसेंबर 2023 रोजी दिल्लीत दुपारी 3 वाजता होणार आहे, असं स्पष्ट केलं.

जागावाटपाबाबत चर्चा होऊ शकते

या बैठकीत पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी जागावाटपाबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. वास्तविक, सार्वत्रिक निवडणुकीसाठी आघाडीची रणनीती आणि जागावाटप ठरवण्यासाठी राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा निवडणुकीच्या निकालांची प्रतीक्षा केली जात होती. आता निकाल हाती आले असून या बैठकीत जागावाटपावर चर्चा होऊ शकते. काँग्रेसला इंडिया आघाडीत बिग ब्रदरची भूमिका बजावायची आहे, मात्र निवडणुकीतील पराभवानंतर पक्षाला मोठा धक्का बसला आहे. अशा स्थितीत आघाडीतील काँग्रेसची बार्गेनिंग पॉवर कमी झाली आहे. आता फॉर्म्युला कसा असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Tags

follow us