FSSAI approves prosecution against bisleri over unsafe water : प्रवासात असो किंवा घरी देखील लोक पिण्याच्या सीलबंद पाण्याला प्राधान्य देतात. त्यात बिस्लेरी हा नामांकित ब्रँड आघाडीवर असतो. आता मात्र याचं पाण्याबाबात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ती म्हणजे बिस्लेरी इंटरनॅशनलच्या पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरच्या पाण्यात शरीरास धोकादायक घटक आढळून आले आहेत.
तो विश लिस्टचा भाग; मुख्यमंत्री होण्याच्या इच्छेबाबत तुकाराम मुंढेंचं स्पष्ट अन् सूचक उत्तर
एफएसएसएआयकडूनसध्या विविध पेय उत्पादक कंपन्यांची तपासणी सुरू आहे. यामध्ये बिस्लेरी इंटरनॅशनलच्या पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरच्या नमुन्यांमध्ये निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त प्रमाणात ब्रोमेट आणि पॉलीन्यूक्लियर अॅरोमॅटिक हायड्रोकार्बन्स आढळून आले आहेत. त्यामुळे हे पाणी असुरक्षित घोषित करण्यात आले आहे. या प्रकरणी अन्न सुरक्षा आणि मानक कायदा, २००६ अंतर्गत बिसलेरी इंटरनॅशनल कंपनीविरोधात खटला चालवण्यासही मंजुरी देण्यात आली आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, असुरक्षित पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरच्या प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे.
The Food Safety and Standards Authority of India (FSSAI) continues to maintain strict enforcement across food sectors to protect consumer health and enforce regulatory compliance. Recent inspections and compliance verifications have led to immediate enforcement actions against various
FBOs.— ANI (@ANI) November 22, 2026
