ग्राहकांनो, Everest जिरे पावडरची ‘ही’ बॅच वापरु नका;  FSSAI दिले मोठे आदेश 

Everest Food Products :   एव्हरेस्ट फूड प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडच्या जिरे पूडच्या एका विशिष्ट बॅचविरोधात फूड सेफ्टी अँड स्टँडेर्ड्स ऑथॉरिटी

Everest Food Products

Everest Food Products :   एव्हरेस्ट फूड प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडच्या जिरे पूडच्या एका विशिष्ट बॅचविरोधात फूड सेफ्टी अँड स्टँडेर्ड्स ऑथॉरिटी ऑफ इंडियाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. FSSAI ने दिलेल्या माहितीनुसार, या बॅचबाबत प्रयोगशाळेत करण्यात आलेल्या तपासणीत काही कीटकनाशकांचे अवशेष निर्धरित कमाल अवशेष मर्यादेपेक्षा जास्त असल्याचे निष्पन्न झाले आहे. कमाल अवशेष मर्यादेपेक्षा कीटकनाशकांचे अवशेष जास्त असल्याने FSSAI ही बॅच असुरक्षित घोषित करुन ती बाजारातून परत मागवण्याचे आदेश दिले आहेत.

FSSAI नुसार ही कारवाई बॅच क्रमांक E080668761 शी संबंधित असून 4 ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात आलेल्या नियमाक कारवाईनुसार, एव्हरेस्ट फूड प्रॉडक्ट्सला (Everest Food Products) या बॅचमधील सर्व उत्पादने बाजारातून परत मागवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याच बरोबर रिकॉल करण्यात आलेल्या सर्व उत्पादनांची संपूर्ण नोंद ठेवून निर्धारित मुदतीत संबंधित माहिती आणि स्थिती अहवाल सादर करण्याचे आदेश देखील देण्यात आल्याची माहिती FSSAI कडून देण्यात आली आहे.

FSSAI ने दिलेल्या माहितीनुसार, या कारवाईची सुरुवात गोव्यातून करण्यात आली. गोव्यातील रिव्हरसाइड रिसॉर्ट्स अँड हॉलिडे होम्स प्रायव्हेट लिमिटेडच्या आवारातून एव्हरेस्ट जिरे पूडचा अन्न सुरक्षा नमुना घेण्यात आला होता. तर प्रयोगशाळेतील प्राथमिक तपासणीत जिरे पूडमध्ये अझोक्सिस्ट्रोबिन (Azoxystrobin) आणि थियामेथोक्सम (Thiamethoxam)  कीटकनाशकांचे अवशेष निर्धारित एमआरएल पेक्षा अधिक असल्याचे आढळले. यानंतर कंपनीला अपील करण्याची संधी देण्यात आली होती. तसेच नमुना पुढील तपासणीसाठी रेफरल फूड लॅबोरेटरीकडे पाठवण्यात आला. या प्रयोगशाळेतील तपासणीतही अझोक्सिस्ट्रोबिन आणि थियामेथोक्समचे प्रमाण जास्त असल्याचे निष्पन्न झाल्याने सर्व सर्व उत्पादने रिकॉल करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

दुबईतून ग्लोबल बिझनेस रिअ‍ॅलिटी Game Changers शोची सुरुवात; आर. माधवन करणार होस्ट

FSSAI ने हे स्पष्ट केले आहे की, FSSAI चा आदेश फक्त E080668761 या विशिष्ट बॅचपुरता मर्यादित असून कंपनीच्या सर्व जिरे पूड उत्पादनाना लागू नाही. त्यामुळे ग्राहकांनी खरेदी करताना पाकिटावरील बॅच क्रमांक तपासावे.

follow us