Download App

उत्तर प्रदेश पोलिसांनी आणखी एक कुख्यात गँगस्टर संपवला

Gangster Anil Dujana Killed : वाढती गुन्हेगारी व पोलिसांच्या सुरु असलेल्या कारवायांमुळे उत्तर प्रदेश राज्य हे सध्या चर्चेत आहे. अतिक अहमदच्या हत्येनंतर यूपी सरकारवर टीका झाली. एकीकडे हे सगळं अद्यापही सुरु असताना पुन्हा एकदा उत्तर प्रदेशात एक एन्काऊंटर घडल्याची माहिती समोर आली आहे. पश्चिम उत्तर प्रदेशातील कुख्यात गुन्हेगार अनिल दुजाना (Anil Dujana) हा पोलीस चकमकीत मारला गेला आहे. मेरठ जिल्ह्यात युपी एसटीएफने त्याचा खात्मा केला आहे. दरम्यान याबाबतची माहिती यूपी एसटीएफचे प्रमुख आयपीएस अमिताभ यश यांनी दिली आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वी उत्तरप्रदेश सरकारने कुख्यात 65 माफियांची यादी जाहीर केली होती. यामध्ये ग्रेटर नोएडातील अनिल दुजाना यांचेही नाव होते. कुख्यात गुन्हेगार अनिल दुजाना दिल्लीच्या तिहार तुरुंगात बराच काळ बंद होता, मात्र काही काळापूर्वी तो जामिनावर बाहेर आला होता.

तुरुंगातून बाहेर येताच दुजानाने त्याची पत्नी संगीता, आणि जयचंद प्रधान हत्या प्रकरणातील साक्षीदार यांना धमकावले. यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कारवाई करत गेल्या आठवड्यात अनिल दुजाना याच्यावर गुन्हे दाखल केले होते. गुन्हा दाखल झाल्यानंतर नोएडा पोलिस व एसटीएफची टीम ही गँगस्टर दुजानाला पकडण्यासाठी रवाना झाली. त्याला पकडण्यासाठी स्पेशल टीमनं अनेक ठिकाणी छापे देखील टाकले होते.

अनिल दुजानाला एसटीएफने चकमकीत ठार केले. एसटीएफने मेरठमध्ये ही कारवाई केली. धक्कादायक बाब म्हणजे अनिल हा मोठा गुन्हा करण्याचा कट आखत असल्याची माहिती एसटीएफला मिळाली होती. त्यामुळे स्पेशल टीमने तातडीने त्याचा शोध सुरू केला व पोलिसांची झालेल्या चकमकीत अखेर तो ठार झाला.

तब्बल बारा वर्षांनंतर पाकिस्ताचे पराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर

गुन्ह्याचा बादशहा
कुख्यात गँगस्टर अनिल दुजाना यांच्यावर यूपीसह इतर राज्यांमध्ये खून, खंडणी, खंडणी आदी सुमारे 50 गुन्हे दाखल आहेत. बदलपूरचे दुजाना गाव एकेकाळी कुप्रसिद्ध डाकू म्हणून ओळखले जात होते. अनिल नगर उर्फ ​​अनिल दुजाना हा याच दुजाना गावचा आहे. पोलिस रेकॉर्डमध्ये, 2002 मध्ये, हरबीर पहेलवानच्या हत्येचा पहिला गुन्हा गाझियाबादमधील कवी नगर पोलिस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला होता.

Tags

follow us