Download App

गुडन्यूज! एप्रिलच्या पहिल्याच दिवशी गॅस दरात मोठी कपात; वाचा नवीन दर

एप्रिल महिन्यात व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात मोठी कपात झाली आहे. जवळपास 40 ते 45 रुपयांनी दर कमी झाले आहेत.

LPG Cylinder Price : आज 1 एप्रिल. आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी गुडन्यूज मिळाली आहे. दिल्लीपासून चेन्नईपर्यंत देशातील सर्वच महानगरांत गॅस सिलिंडरच्या दरात घट झाली आहे. दर कपात फक्त कमर्शिअल गॅसच्या दरात झाली आहे. तेल कंपन्यांनी यंदाही घरगुती गॅसच्या दरात कोणतीही कपात किंवा वाढ केलेली नाही. विशेष म्हणजे, एप्रिल महिन्यात व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात मोठी कपात झाली आहे. जवळपास 40 ते 45 रुपयांनी दर कमी झाले आहेत.

मागील अकरा महिन्यांपासून घरगुती गॅसचे दर स्थिर आहेत. यात कोणताच बदल झालेला नाही. परंतु, व्यावसायिक गॅसचे दर मात्र सातत्याने बदलत आहेत. मार्च 2024 मध्ये घरगुती गॅस दरात शेवटची कपात झाली होती. तेव्हापासून या गॅसच्या दरात कोणतीही कपात झालेली नाही. आताही तेल कंपन्यांनी घरगुती गॅसच्या दरात काहीच बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे.

महिन्याच्या पहिल्याच दिवशी झटका, गॅस सिलिंडरच्या दरात वाढ; वाचा नवीन दर

आयओसीएलकडून मिळालेल्या माहितीनुसार राजधानी दिल्लीत कमर्शिअल गॅस सिलिंडरच्या दरात 41 रुपये कपात झाली. आता हा सिलिंडर 1762 रुपयांना मिळणार आहे. कोलकात्यात यंदा व्यावसायिक गॅसच्या दरात जवळपास 44.5 रुपये कपात झाली आहे. आता या शहरांत एका गॅस टाकीसाठी 1868.50 रुपयांना मिळेल. देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत गॅस 42 रुपयांनी स्वस्त झाला आहे. आता येथे एक गॅस सिलिंडरसाठी 1713.50 रुपयांना मिळणार आहे. तामिळनाडूची राजधानी चेन्नई शहरात व्यावसायिक गॅसच्या दरात 43.5 रुपये कपात झाली असून येथे 1921.50 रुपयांना गॅस टाकी मिळेल.

घरगुती गॅसच्या दरात वाढ नाही

या दरवाढीतून घरगुती गॅसधारकांना दिलासा मिळाला आहे. या गॅसच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. काही महिन्यांपासून घरगुती गॅसच्या दरात वाढ झालेली नाही. 14.2 किलो घरगुती एलपीजी सिलिंडर मागील महिन्यातील दरावरच मिळत आहे. दिल्लीत 803 रुपये, कोलकात्यात 829 रुपये, मुंबईत 802.50 रुपये तर चेन्नई 818.50 रुपये या दरांत घरगुती गॅस मिळत आहे. मार्च 2024 मध्ये घरगुती गॅस दरात शेवटची कपात झाली होती. त्यावेळी तेल कंपन्यांनी गॅस दरात थेट 200 रुपये कपात केली होती.

फिक्स्ड डिपॉझिट ते एलपीजी गॅस 1 मार्चपासून ‘हे’ मोठे बदल होणार, परिणाम थेट खिश्यावर

follow us