Download App

Gautam Adani यांनी स्वत:च सांगितले FPO मागे घेण्याचे कारण, म्हणाले

  • Written By: Last Updated:

नवी दिल्ली : अदानी ग्रुपने अदानी एंटरप्रायझेसची 20,000 कोटी रुपयांची फॉलो-ऑन पब्लिक ऑफर (FPO) काल रात्री उशिरा मागे घेतली. यानंतर आज गौतम अदानी (Gautam Adani) यांनी स्वत: पुढे येऊन गुंतवणूकदारांना समजावून सांगितले आणि एफपीओ मागे घेण्याचे कारणही दिले. 20,000 कोटी रुपयांचा हा FPO 27 जानेवारीला सबस्क्रिप्शनसाठी उघडला गेला आणि 31 जानेवारीला पूर्ण सदस्यता झाल्यानंतर बंद झाला होता.

एफपीओ म्हणजे काय ?

फॉलो ऑन पब्लिक ऑफर (FPO) हा कंपनीसाठी पैसे उभारण्याचा एक मार्ग आहे. स्टॉक मार्केटमध्ये आधीच सूचीबद्ध असलेली कंपनी गुंतवणूकदारांना नवीन शेअर्स ऑफर करते. हे शेअर्स सध्या बाजारात असलेल्या शेअर्सपेक्षा वेगळे असतात.

https://letsupp.com/national/adani-group-reverses-decision-cancels-fpo-says-/9628.html

फॉलो ऑन पब्लिक ऑफर (एफपीओ) मध्ये वीस हजार कोटी रुपये अडाणी ग्रुप मध्ये गुंतवण्यात आले होते मात्र ऑफर प्राईस पेक्षा अदानी इंटरप्राईजेसच्या शेअरमध्ये आज तब्बल 36 टक्के घट झाली याचा मोठा फटका गुंतवणूकदारांना बसला असता तो टाळण्यासाठी अडाणी यांनी हे पैसे गुंतवणूकदारांना परत देण्याचा निर्णय आज रात्री उशिरा घेतला आहे.

अदानी ग्रुपकडून पब्लिश केलेल्या व्हीडीओमध्ये गौतम अदानी म्हणाले की, एक उद्योजक म्हणून माझ्या ४ दशकांहून अधिकच्या प्रवासात मला सर्व भागधारकांकडून, विशेषत: गुंतवणूकदार समुदायाकडून भरभरून पाठिंबा मिळाला आहे. माझ्यासाठी हे मान्य करणे महत्त्वाचे आहे की मी आयुष्यात जे काही थोडेसे मिळवले ते त्यांच्या विश्वासामुळे आणि विश्वासामुळे. माझ्या सर्व यशाचे श्रेय मी त्याला देतो.

 

Tags

follow us