Dharmendra Pradhan : नीट पेपर फुटी प्रकरणानंतर दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर झालेल्या विद्यार्थी आंदोलनानंतर शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा भाजप नेते आणि खासदार धर्मेंद्र प्रधान यांना द्यावा लागला होता. या राजीनाम्यानंतर आता आंदोलनादरम्यान जेन झी ची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचा दावा केला आहे. शिक्षणमंत्री पदाच्या राजीनाम्यासाठी दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर हजारो विद्यार्थ्यांनी आंदोलन करत राजीनाम्याची मागणी केली होती.
नेमकं काय म्हणाले धर्मेंद्र प्रधान ?
भुवनेश्वर येथील जीएम विद्यापीठात (GM University) बोलताना धर्मेंद्र प्रधान म्हणाले की, देशात दरवर्षी सुमारे 2 कोटी मुलांचा जन्म होतो. गेल्या दशकात देशाच्या लोकसंख्येत सुमारे 20 कोटी मुलांची भर पडली आहे. हे तरुण भारताच्या आकांक्षांना पुढे नेतील आणि देशाला विश्वगुरु म्हणून प्रस्थापित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतील असं धर्मेंद्र प्रधान म्हणाले.
पुढे बोलताना धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) म्हणाले, केंद्रीय मंत्रिमंडळातील आपल्या पदाचा राजीनामा देण्यासाठी त्यांनी स्वत :हून पंतप्रधान मोदींशी संपर्क साधला होता. मंत्रिपद भूषवणे ही कधीच आपली वैयक्तिक प्राथमिकता नव्हती असं देखील धर्मेंद्र प्रधान म्हणाले.
राष्ट्रवादी शरद पवार गट भाजपसोबत जाणार? सुप्रिया सुळे 8 खासदारांसह PM मोदींना भेटणार-
तर दुसरीकडे यावेळी त्यांनी ओडिशाचे माजी मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्यावरही देखील जोरदार हल्लाबोल केला. बीजेडीच्या कार्यकर्त्यांनी केलेले आंदोलन किंवा आपल्या विरोधात दिलेल्या धर्मेंद्र प्रधान गो बॅक च्या घोषणांमुळे आपण विचलित झालो नाही. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे मी परत येणार असं देखील यावेळी धर्मेंद्र प्रधान म्हणाले.
