Download App

ओयो रुमवर मुली आरती करायला तर जात नाहीत ना? महिला आयोगाच्या अध्यक्षांनी केली मुलींची कान उघाडणी

  • Written By: Last Updated:

‘Girls don’t go to OYO rooms to recite Hanuman’s Aarti’ : हरियाणा महिला आयोगाच्या अध्यक्षा रेणू भाटिया (Renu Bhatia) यांनी मुलींबाबत एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. एका कार्यक्रमात बोलतांना त्यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं. मुली ओयो रूममध्ये हनुमानाची आरती करायला तर जात नाही ना, असा थेट सवाल करत त्यांनी मुलींची कान उघाडणी केली. त्यांच्या या वक्तव्याने सामाजिक वर्तृळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

कैथल जिल्ह्यातील आरकेसएसडी कॉलेजमध्ये कायदे आणि सायबर क्राईम याविषयावर जनजागृतीपर कार्यक्रम झाला. यावेळी महिला आयोगाच्या अध्यक्षा रेणू भाटीया या प्रमुख अतिथी होत्या. यावेळी बोलतांना त्यांनी महिलांना सायबर क्राईम आणि महिला अत्याचाराविषयी सावध केलं. त्या म्हणाल्या की, मुली ओयो रुममध्ये हनुमानाची आरती करायला जात नाहीत ना, तिथं आपल्या सोबत कुठलाही वाईट प्रंसग घडू शकतो, हे न समजालया मुली इतक्या दुधखुळ्या कशा काय असतात, असा सवाल सवाल त्यांनी केला. दरम्यान, अशा ठिकाणी ठिकाणी जाताना तुमच्यासोबत वाईट प्रसंग घडू शकतो, हे मलींनी कायम लक्षात ठेवावं, असा सल्लाही त्यांनी दिला.

कॉलेजमध्ये येताच मुला-मुलींना स्वतंत्र वाटू लागते- भाटिया
रेणू भाटिया म्हणाल्या की, मुलगा किंवा मुलगी कॉलेजमध्ये येताच ते स्वत:ला स्वतंत्र समजू लागतात. त्यांना असे वाटते की आपल्याला काय मिळेल अन् काय नाही. मुलींना वाटते की, त्या हवे ते कपडे परिधान करून हवं तिथं जाऊ शकतात. शिवाय मुलंही विचार करू लागतात की कॉलेजमध्ये येताच आपल्या गर्लफेंडला फिरण्याची वेळ आली आहे.

Sahil Khan: अभिनेता साहिल खान विरोधात तक्रार दाखल, काय आहे प्रकरण?

कायद्यामुळे आमचे हात बांधले गेले आहेत
मुलींच्या छेडछाडीच्या घटनांचा मुद्दा मांडतांना रेणू यांनी लिव्ह इन कायद्यावरही भाष्य केलं. त्यांनी सांगितले की, शारीरिक शोषणाची जी सर्व प्रकरणे समोर येतात ती बहुतेक लिव्ह-इनची असतात. त्यामुळे या प्रकरणांमध्ये हस्तक्षेप करणे कठीण होते. कायद्यामुळे आमचे हात बांधले गेले आहेत. रेणू भाटिया म्हणाल्या की, सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये बनवलेल्या लिव्ह-इन रिलेशनशिप कायद्यामुळे आयोगाला अनेक प्रकरणांमध्ये हात बांधून ठेवावे लागत आहेत. त्यामुळं या कायद्यांची पुनरावलोकन करून त्यात बदल करण्याची गरज आहे. असं सांगतानाच प्रेमाच्या नावाखाली होणाऱ्या शोषणाच्या घटनांवर त्यांनी कडक शब्दात प्रहार केला. त्या म्हणाल्या की, मुली ओयो रुममध्ये हनुमानाची आरती करायला जात नाहीत, अशा ठिकाणी जातांना आपल्या सोबत वाईट प्रसंग घडू शकतो, हे मुलींनी लक्षात ठेवावं.

कुटुंबे तुटत आहेत – रेणू भाटिया
रेणू भाटिया म्हणाल्या की, आमच्याकडे जितकी प्रकरणं आली तितकी प्रकरणं ही लिव्ह इन रिलेशनशिपची होती. अशा प्रकरणांध्ये आम्ही जास्त काही हस्तक्षेप करू शकत नाही. मात्र, तरीही आम्ही या प्रकणांतील पीडितेला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करत असतो. या लिव्ह इन लॉ मुळे गुन्हे कमी होत नसून वाढत आहेत. अशा घटनांमुळे कुटुंबच्या कुटुंब उध्वस्त होत आहेत. अशा प्रकरणांमध्ये, पीडिता सांगतात असतात की, आरोपीने तिला पेयात काहीतरी मिसळून प्यायला लावले आणि नंतर तिच्यावर शारीरिक अत्याचार केले. पण माझा प्रश्न हा आहे की, मुलींना हे ठाऊक नसतं का की, जेव्हा आपण ओयो रुमसारख्या ठिकाणी जातो, तेव्हा तिथं आपण हनुमानाची आरती तर करणार नाही. आपण अशा ठिकाणी जातो, तेव्हा काहीतरी गडबड होऊ शकतो, असा विचार त्यांनी करायला हवं, असं सांगत मुलींना सावध केलं.

 

Tags

follow us