Gold Price News : जागतिक स्तरावर सोन्याचे भाव गगनाला भिडत असताना, भारतीय खरेदीदारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या (WGC) ताज्या अहवालानुसार, फेब्रुवारीमध्ये जागतिक स्तरावर सोन्याच्या किमती गगनाला भिडलेल्या असताना भारतात मात्र, सोन्याच्या किमतीत घसरण झाल्याचा महत्त्वाचा खुलासा करण्यात आला आहे. नेमकं भारतात सोन्याच्या किमती घसरण्यामागचं कारण काय? WGC चा रिपोर्ट नेमका काय? त्याबद्दल जाणून घेऊया…
Women’s Day : पुरुषांच्या वर्चस्वात इतिहास घडवून भारतरत्न मिळवणाऱ्या 5 महिलांची कहाणी
जगात सोनं महाग, भारतात स्वस्त, किंमत का घसरली?
एकीकडे जागतिक बाजार पेठेत सोन्याच्या किमती मोठी वाढ होत असताना भारतात सोन्याच्या किमतीत घसरण होण्यामागे अमेरिकेसोबतचा मोठा व्यापार करार आणि भारतीय रुपयाची ताकद असल्याचे सांगण्यात येत आहे. सामान्यतः जेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे भाव वाढतात तेव्हा भारतातही भाव वाढतात. मात्र, फेब्रुवारीमध्ये उलट घडले. जागतिक स्तरावर सोन्याचे भाव 5 % वाढून 5,222 डॉलर प्रति औंस झाले, परंतु भारतातील स्थानिक भाव 3.5 % घसरले. असे होण्याचे मुख्य कारण अमेरिकेने आयात शुल्कात सवलत दिल्यानंतर भारतीय रुपया लक्षणीयरीत्या मजबूत झाला, या मजबूतीमुळे भारतीय खरेदीदारांसाठी सोने स्वस्त झाले. why gold price is falling in india
फेब्रुवारीमध्ये भारतातील सोन्याने दिला -3.5 % परतावा
फेब्रुवारी महिना गुंतवणूकदारांसाठी थोडा वेगळा होता. जागतिक स्तरावर सोन्याने सकारात्मक परतावा दिला, तर भारत आणि चीनमध्ये मात्र, सोन्याने निगेटिव्ह रिटर्न दिला. भारतीय गुंतवणुकदारांना फेब्रुवारीमध्ये सोन्यामध्ये -3.5% परतावा मिळाला. अहवालांनुसार, फेब्रुवारीच्या अखेरीस भारतात 10 ग्रॅम सोन्याची स्थानिक किंमत सुमारे 1,58,585 होती.
खुशखबर! गोल्ड लोन EMI मध्ये फेडता येणार, बॅंकांच्या मनमानीला चपराक बसणार; RBI चा प्लॅन काय?
भविष्यात सोने स्वस्त होईल का?
नजीकच्या काळात अमेरिकन डॉलर कमकुवत होऊ शकतो. त्यामुळे जर, डॉलर घसरला तर, जागतिक स्तरावर सोन्याला आधार मिळेल आणि किमती वाढू शकतात. मात्र, भारतातील सोन्याचे भाव मुख्यत्वे डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या मजबूतीवर अवलंबून असतील. सध्या, रुपयाच्या मजबूतीमुळे भारतातील जागतिक चलनवाढीचा प्रभाव कमी झाल्याचेही वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या अहवालात सूचित करण्यात आले आहे.
