कारखान्यांसाठी गोड बातमी! साखर निर्यातीला केंद्राची मंजुरी; ‘इतकी’ साखर होणार निर्यात

देशांतर्गत साखरेच्या किंमती स्थिर करणे आणि साखर उद्योगाला पाठबळ देण्याच्या उद्देशाने सरकारने साखऱ निर्यातीचा निर्णय घेतला आहे.

Sugar Factory

Sugar Factory

Sugar Price Update : केंद्र सरकारने साखर कारखान्यांना दिलासा देणारा (Sugar Price) निर्णय घेतला आहे. सप्टेंबर महिन्यात संपणाऱ्या 2024-25 सत्रासाठी दहा लाख टन साखर निर्यात करण्याला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. देशांतर्गत साखरेच्या किंमती स्थिर करणे आणि साखर उद्योगाला पाठबळ देण्याच्या उद्देशाने सरकारने हा निर्णय घेतला आहे. केंद्रीय खाद्य मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सोशल मीडियावर या निर्णयाची माहिती दिली. या निर्णयामुळे देशातील पाच कोटी शेतकरी कुटुंब आणि पाच लाख मजुरांना फायदा होणार आहे. तसेच साखर उद्योगाला बळकटी येईल.

खाद्य मंत्रालयाच्या आदेशात म्हटले आहे की आवंटीत प्रमाणात सर्व प्रकारातील ग्रेडच्या साखरेच्या निर्यातीली परवानगी आहे. 2024-25 या वर्षात साखर उत्पादनास सुरुवात करणारे नवीन साखर कारखाने आणि बंद पडून पुन्हा सुरू होणाऱ्या सर्व कारखान्यांनाही निर्यात कोटा मिळाला आहे.

या निर्णयानुसार 30 सप्टेंबरपर्यंत साखर कारखाने थेट किंवा व्यापारी निर्यातकांच्या माध्यमातून साखर निर्यात करू शकतात. 31 मार्चपर्यंत कोटा सोडणे किंवा वाहतुकीचा खर्च कमी करण्यासाठी घरेलू कोट्याबरोबर आदानप्रदान करण्याचाही पर्याय उपलब्ध राहणार आहे.

साखर खरेदी गैरव्यवहार प्रकरणी मितेश नाहाटाला अटक, इंदौरच्या व्यावसायिकाची २.६१ कोटींची फसवणूक

देशात साखरेच्या किंमती मागील 18 महिन्यांत अतिशय कमी झाल्या असताना हा निर्णय घेण्यात आला आहे. 2024-25 या वर्षात देशात साखरेचे उत्पादन 2.7 कोटी टन इतके होईल असा अंदाज आहे. मागील वर्षात साखर उत्पादन 3.2 कोटी टन होते. देशांतर्गत मागणीच्या तुलनेत उत्पादन कमी असल्याचे दिसत आहे.

राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघटनेनुसार देशाचे साखर उत्पादन 15 जानेवारीपर्यंत 1 कोटी 30 लाख टन इतके होते. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक या राज्यांत उत्पादन कमी झाल्याने वर्ष प्रति वर्ष 13.66 टक्के कमी झाले आहे.

दरम्यान, देशातील साखर मागणी आणि पुरवठ्याचा विचार करता 2023-24 वर्षातील सत्रात साखर निर्यात बंदीचा निर्णय सरकारने घेतला होता. परंतु, आता निर्यात बंदी उठवण्यात आली आहे. भारतीय साखर आणि जैव ऊर्जा निर्माता संघटनेने या निर्णयाचे स्वागत केले आहे. संघटनेचे महानिदेशक दीपक बल्लानी यांनी म्हटले आहे की हा निर्णय साखर कारखान्यांना दिलासा देणारा ठरणार आहे. यामुळे कारखान्यांच्या उत्पन्नात भर पडणार आहे. तसेच ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वेळेवर उसाचे पेमेंट मिळण्यासही मदत होणार आहे.

साखर महागणार? 11 रुपयांनी भाव वाढण्याची शक्यता, केंद्र सरकारचे संकेत

Exit mobile version