Government Announces Fund To Support Content Creator Economy : इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या (Social Media) सुलभ आणि परवडणाऱ्या उपलब्धतेमुळे भारताच्या क्रिएटर अर्थव्यवस्थेला नवीन उंचीवर नेलंय. लाखो तरुण आता YouTube, Instagram आणि इतर डिजिटल प्लॅटफॉर्मवर कंटेंट निर्मितीद्वारे आपले करिअर घडवत (Content Creator) आहेत. ब्रँड आणि उद्योगांसाठी देखील महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. हेच लक्षात घेत केंद्र सरकारने क्रिएटर अर्थव्यवस्थेला (economy) पाठिंबा देण्यासाठी 1 अब्ज डॉलर्सचा निधी सुरू करण्याची घोषणा केलीय.
सरकारचा नवीन उपक्रम
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन शिखर परिषद (वेव्हज) 2025 दरम्यान या निधीची घोषणा केली. हा निधी सार्वजनिक-खाजगी भागीदारी (पीपीपी) अंतर्गत काम करेल, तो निर्मात्यांना आर्थिक सहाय्य प्रदान करेल. त्यांना त्यांची सामग्री जागतिक स्तरावर पोहोचविण्यास सक्षम करेल, असं त्यांनी म्हटलंय.
पवार कुटुंबावर शोककळा! शरद पवारांचे धाकटे बंधू प्रतापराव पवार यांच्या पत्नी भारती पवार यांचं निधन
याशिवाय 391 कोटी रुपये खर्चाच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी (IICT) ची स्थापना करण्यासही मान्यता देण्यात आली आहे. ही संस्था मुंबईतील फिल्म सिटी, गोरेगाव येथे आयआयटी आणि आयआयएमच्या धर्तीवर स्थापन केली जाईल, जिथे कंटेंट निर्मिती आणि डिजिटल मीडियाशी संबंधित उच्चस्तरीय प्रशिक्षण दिले जाईल, अशी देखील माहिती अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे.
सर्वात मोठं डिजिटल अरेस्ट स्कॅम! 86 वर्षीय महिलेची 20 कोटींची फसवणूक, मुंबईत भयंकर घडलं
भारताची क्रिएटर इकॉनॉमी 30 अब्ज डॉलर्स
भारताची क्रिएटर इकॉनॉमी 30 अब्ज डॉलर्सच्या उद्योगात वाढली आहे. देशाच्या जीडीपीमध्ये अंदाजे 2.5 टक्के योगदान आहे. इन्फ्लुएंसर मार्केटिंग देखील वेगाने वाढत आहे, त्याचे मूल्य 3,375 कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे. EY अहवालानुसार, भारतातील 12 टक्के निर्माते दरमहा 1 लाख ते 10 लाख रुपयांपर्यंत कमाई करतात आणि 86 टक्के निर्मात्यांचे पुढील दोन वर्षांत उत्पन्न वाढण्याचा अंदाज आहे.
वेव्हज मार्केट आणि जागतिक संधी
सरकारने WAVES Bazaar नावाचे एक जागतिक ई-मार्केटप्लेस सुरू केलंय. हे मार्केटप्लेस भारतीय निर्मात्यांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठांशी जोडणार आहे. हे व्यासपीठ चित्रपट, टीव्ही, गेमिंग, संगीत, अॅनिमेशन आणि ईस्पोर्ट्स सारख्या क्षेत्रातील कंटेंट निर्मात्यांना जागतिक संधी प्रदान करेल. भारताची क्रिएटर इकॉनॉमी केवळ सोशल मीडियापुरती मर्यादित नाही, तर ती नवीन नोकरीच्या संधी आणि जागतिक ओळखीचे माध्यम देखील बनत आहे. हा निधी आणि सरकारचे नवीन उपक्रम भारताला सामग्रीचा मूळ निर्यातदार बनवण्याची दिशा मजबूत करतील.