OTT App Banned : सरकारचा डिजिटल स्ट्राईक; अश्लील कंटेंट दाखवणारे ‘या’ 5 ओटीटी प्लॅटफॉर्मवर बंदी

OTT App Banned : केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत देशात 5 ओटीटी प्लॅटफॉर्मवर बंदी आणली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने याबाबत

OTT App Banned

OTT App Banned

OTT App Banned : केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत देशात 5 ओटीटी प्लॅटफॉर्मवर बंदी आणली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारने MoodXVIP, Koyal PlayPro, Digi Movieplex, Feel आणि Jugnoo वर देशात पूर्णपणे बंदी आणली आहे. IT नियम 2021 अंतर्गत ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. अश्लील कंटेंट दाखवत असल्याने सरकारकडून या ओटीटी प्लॅटफॉर्मवर बंदी घालण्यात आली आहे.

इशाऱ्या देऊनही सुधारणा नाही

ही कारवाई अचानक नव्हती. सरकारने सप्टेंबर 2024 मध्ये या प्लॅटफॉर्मना नोटिसा पाठवून त्यांना सुधारणा करण्याचा इशारा दिला. काहींनी नोटिशांना प्रतिसादही दिला नाही, तर काहींनी हुशारीने त्यांचे डोमेन नाव बदलले किंवा तेच जुने कंटेंट स्ट्रिमिंग सुरू केले. फेब्रुवारी 2025 मध्येही, सर्व ओटीटी प्लॅटफॉर्मना नैतिकता संहिता पाळण्याची आठवण करून देण्यात आली होती, परंतु सुधारणा होण्याऐवजी, या पाचही प्लॅटफॉर्मनी नियमांकडे दुर्लक्ष करत राहिले. त्यामुळे आता सरकारने मोठा निर्णय घेत या पाच ओटीटी प्लॅटफॉर्मवर कायमची बंदी आणली आहे.

पोखरण फील्ड फायरिंग रेंजमध्ये अग्नि वर्षा सराव; 25 देशांतील पत्रकार सहभागी

आयटी नियम 2021

सरकारने आयटी (मध्यस्थ मार्गदर्शक तत्त्वे आणि डिजिटल मीडिया नीतिमत्ता संहिता) नियम, 2021 चा वापर करून हे स्पष्ट केले आहे की, ओटीटी प्लॅटफॉर्म अनियंत्रित नाहीत. आता असं दिसून येते की सरकार आता केवळ तक्रारींची वाट पाहत नाही तर त्यांच्यावर सक्रियपणे लक्ष ठेवत आहे. सरकारच्या या कारवाईमुळे जे बोल्ड कंटेंटवर आधारित सबस्क्रिप्शन विकत होते असे लहान आणि नोंदणी नसलेल्या ओटीटी अ‍ॅप्सना अडथळा निर्माण होणार आहे.

Exit mobile version