Download App

शेतकऱ्यांना धक्का, सामान्यांना दिलासा! साखरचे दर गडगडणार; मोदी सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : साखरेचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने उसाच्या रसापासून इथेनॉल उत्पादनासाठी बंदी घातली आहे. यासंदर्भातील अधिसूचना सरकारने गुरुवारी जारी केली. अन्न आणि पुरवठा मंत्रालयाने सर्व साखर कारखानदार आणि डिस्टिलरीजना इथेनॉलचे उत्पादन ताबडतोब बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामुळे आता साखर कारखान्यांमध्ये साखरेचे उत्पादन वाढण्याची शक्यता आहे. (Govt directs mills to not use sugarcane juice to produce ethanol for petrol blending to check sugar prices)

या निर्णयाबबात ग्राहक व्यवहार आणि अन्न पुरवठा मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, जीवनावश्यक वस्तू कायदा 1955 नुसार, अन्न आणि सार्वजनिक वितरण विभाग विविध जीवनावश्यक वस्तू, विक्री आणि उपलब्धता यावर लक्ष ठेवत असतो. याच अंतर्गत साखरेची किंमत स्थिर रहावी यासाठी सरकारने 2023-24 या काळात साखर कारखान्यांना आणि डिस्टिलरींना साखरेच्या रसापासून इथेनॉल बनवू नये असे आदेश दिले आहेत. हा आदेश तात्काळ होत आहे. परंतु तेल विक्री कंपन्यांकडून सध्या मिळालेल्या मागणीचा पुरवठा करण्यासाठी बी-हेवी मोलॅसेसपासून इथेनॉलचा पुरवठा सुरु राहणार आहे.

Madarsa Board : योगी आदित्यनाथ यांच्या रडारवर मदरासे! शंभर कोटी विदेशातून आले ? चौकशीसाठी एसआयटी

साखरेपासून इथेनॉल निर्मितीच्या उत्पादनावर बंदी घातल्याची बातमी येताच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत साखरेचे भाव सुमारे 8 टक्क्यांनी घसरले आहेत. या निर्णयाचा परिणाम देशांतर्गत बाजारातही दिसून येईल, असे मानले जात आहे. साखर कारखान्यांमध्ये साखरेचे उत्पादन वाढण्याची शक्यता लक्षात घेता भाव खाली येण्याची शक्यता आहे. सरकारच्या या निर्णयामुळे साखर उत्पादक कंपन्यांच्या शेअर्समध्येही मोठी घसरण झाली आहे. बलराम चिनी 6.60 टक्के, दालमिया इंडिया 6.08 टक्के, डीसीएम श्रीराम 5.80 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाले.

Tags

follow us