Download App

BSNL ला सरकारकडून पाठिंबा, ‘या’ शहरांमध्ये 5G साठी ट्रायल, Jio, Airtel ला मोठा धक्का ?

BSNL 5G : जिओ (Jio) आणि एअरटेलने (Airtel) रिचार्जच्या किमतीमध्ये केलेली वाढ पाहता आता अनेक जण बीएसएनएलमध्ये (BSNL) नेटवर्क पोर्ट करताना

  • Written By: Last Updated:

BSNL 5G : जिओ (Jio) आणि एअरटेलने (Airtel) रिचार्जच्या किमतीमध्ये केलेली वाढ पाहता आता अनेक जण बीएसएनएलमध्ये (BSNL) नेटवर्क पोर्ट करताना दिसत आहे. त्यामुळे बीएसएनएलकडून देखील देशातील विविध भागात 4G नेटवर्कचा विस्तार करण्याचा काम सुरु करण्यात आला आहे.

तर दुसरीकडे आता एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार देशातील काही शहरांमध्ये बीएसएनएल 5G साठी (BSNL 5G) ट्रायल घेणार आहे. त्यामुळे आता लवकरच ग्राहकांना बीएसएनएल 5G नेटवर्क वापरण्यास मिळणार आहे. त्यामुळे जिओ आणि एअरटेलचे ग्राहक मोठ्या प्रमाणात बीएसएनएलमध्ये नेटवर्क पोर्ट करू शकतात ज्यामुळे जिओ आणि एअरटेलला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, एक देशांतर्गत दूरसंचार स्टार्टअप कंपनी बीएसएनएलसोबत बोलत आहे. ही कंपनी बीएसएनएल नेटवर्क वापरून 5G सर्विस देण्याची तयारी करत आहे. या सर्व्हिससाठी कंपनी देशातील काही शहरात ट्रायल करणार आहे. पुढील एक – दोन महिन्यात कंपनीकडून ट्रायल घेण्यात येणार आहे. ट्रायलसाठी सुरुवातीला बीएसएनएलचा 700 मेगाहर्ट्झ बँड वापरला जाणार आहे. देशाची राजधानी दिल्ली, बेंगळुरू, चेन्नई, हैदराबाद आणि गुरुग्राम सारख्या शहरात बीएसएनएल 5G साठी ट्रायल घेणार आहे.

5G साठी ट्रायलसाठी बीएसएनएलकडून पूर्ण पाठिंबा देण्यात येणार आहे. या ट्रायलसाठी कंपनी स्पेक्ट्रम, टॉवर, बॅटरी, वीजपुरवठा आणि इतर पायाभूत सुविधा देणार असल्याची माहिती व्हॉइस ऑफ इंडियन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी एंटरप्रायझेस (VoICE) ने दिली आहे.

VoICE म्हणजे काय?

VoICE हा स्वदेशी दूरसंचार कंपन्यांचा समूह आहे, ज्यामध्ये टाटा कन्सल्टन्सी म्हणजे TCS, तेजस नेटवर्क, VNL, युनायटेड टेलिकॉम, कोरल टेलिकॉम आणि HFCL यांचा समावेश आहे. हा समूह उद्योग BSNL नेटवर्क वापरून 5G साठी देशात ट्रायल घेणार आहे.

सरकारचा पूर्ण पाठिंबा

माहितीनुसार, केंद्र सरकारकडून देखील बीएसएनएल सर्व प्रकारची मदत केली जात आहे. जून 2023 मध्ये सरकारने बीएसएनएलला 89,047 कोटी रुपयांचे आर्थिक पॅकेज दिले होते. या पॅकेजचा वापर कंपनी 4G आणि 5G नेटवर्क रोलआउट करण्यासाठी करणार आहे.

बीएसएनएलला सरकारकडून 700MHz, 2200MHz, 3300MHz आणि 26GHz स्पेक्ट्रम बँड दिले आहे. या स्पेक्ट्रमच्या मदतीने बीएसएनएलकडून देशभरात 4G, 5G नेटवर्क प्रदान करण्यात येणार आहे. याचा फायदा ग्रामीण आणि दुर्गम भागात जलद इंटरनेट सुविधा उपलब्ध करण्यासाठी होणार आहे.

या ठिकणी होणार 5G साठी ट्रायल

कॅनॉट प्लेस – दिल्ली

सरकारी कार्यालय – बंगलोर

संचार भवन – दिल्ली

जेएनयू कॅम्पस – दिल्ली

आयआयटी – दिल्ली

इंडिया हॅबिटॅट सेंटर – दिल्ली

निवडलेले ठिकाण- गुरुग्राम

ताब्यात घेताच दिली कबुली; अटकेनंतर दाऊद शेखनं पोलिसांना काय सांगितलं?

आयआयटी-हैदराबाद

follow us