Download App

Toll Free : आता 20 किलोमीटर बिनधास्त गाडी चालवा, कारण..,

नवीन नियमानूसार आता राष्ट्रीय महामार्गावर सुरुवातीचे 20 किलोमीटरपर्यंत शून्य शुल्क धोरण लागू करण्यात आलं आहे. हा नवीन नियम राष्ट्रीय महामार्ग सुधारणा नियम 2024 या नावाने ओळखला जाणार आहे.

Toll Free : नवीन नियमानूसार आता राष्ट्रीय महामार्गावर सुरुवातीचे 20 किलोमीटरपर्यंत शून्य शुल्क धोरण लागू करण्यात आलं आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून राष्ट्रीय महामार्ग शुल्क (Toll Free) नियमांमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. हा नवीन नियम राष्ट्रीय महामार्ग सुधारणा नियम 2024 या नावाने ओळखला जाणार आहे. त्यामुळे आता राष्ट्रीय महामार्गावर 20 किलोमीटर बिनधास्त गाडी चालवता येणार आहे. राष्ट्रीय महामार्ग, स्थायी पूल, बायपास रस्ता, बोगद्यातील रस्ता, मार्गावर सुरुवातीचे 20 किलोमीटर मोफत प्रवास करता येणार आहे. तर राष्ट्रीय परमिट असलेल्या वाहनांना या नियमांनूसार लाभ घेता येणार नाही.

लोकसभेचीच पुनरावृत्ती! महायुतीला धोबीपछाड, महाविकास आघाडी सुसाट; धक्कादायक सर्व्हे समोर

रस्ते मंत्रालयाकडून जुलै महिन्यात फास्टॅगसोबतच प्रायोगिक तत्वावर ग्लोबल नेव्हिगेशन सिस्टम नूसार टोल संकलन प्रणाली लागू करण्याबाबतची घोषित केलं होतं. आता नवीन नियमांनूसार मोफत प्रवास करायचा झाल्यास जीएनएसएसचा अवलंब करावा लागणार आहे. राष्ट्रीय महामार्गांवर वाहनाने 20 किलोमीटरपेक्षा अधिक प्रवास केल्यास वाहनधारकांकडून पुढील 20 किलोमीटरप्रमाणे फी वसूल करण्यात येणार आहे. चालकांवरील बोझा कमी करण्याचा उद्देश बाळगून हा निर्णय घेण्यात आलायं. प्रवाशांकडून दूरवरील पल्ल्यासाठी शुल्क आकारण्यात येणार आहे.

GST: जीएसटी परिषदेमध्ये विमा हप्त्यावरील टॅक्स कमी करण्यावर चर्चा; अजित पवारांची परिषदेला दांडी

दरम्यान, एका डिजिटल स्टिकरद्वारे प्रवासी सध्या टोलनाक्यावर टोल भरीत आहेत. हे डिजिटल स्टिकर रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन टेक्नॉलॉजी-RFID तंत्रज्ञानावर हे स्टिकर काम करतं. यामध्ये रोख स्वरुपात व्यवहार न करता टोल भरण्यासाठी फास्टॅगचा वापर होतो. नियमांनुसार हा फास्टॅग असणाऱ्या गाड्यांना टोल नाक्यावर थांबावं लागत नाही. या व्यक्तीच्या टोलची रक्कम टॅगशी जोडलेल्या प्री-पेड अकाऊंट वा बँक अकाऊंटमधून कापली जाते.

follow us