Shivendra Raje : टोलनाके चालवणाऱ्या खासदारांनी मला शहाणपणा शिकवू नये, उदयनराजेंना टोला

Shivendra Raje : टोलनाके चालवणाऱ्या खासदारांनी मला शहाणपणा शिकवू नये, उदयनराजेंना टोला

सातारा : साताऱ्याच्या दोन्ही राजांमधील वाद हे सगळ्या जिल्ह्याला माहिती आहे. यातच खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी केलेल्या एका आरोपावर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (shivendrasinh raje bhosale) यांनी चांगलेच प्रत्युत्तर दिले आहे. छत्रपतींच नाव सांगणारे टोलनाके चालवतात, लोकांना धमकावून, मारहाण करतात. तुमचे टोलनाक्याच्या अर्थकारण संपूर्ण जिल्ह्याला माहिती आहे. म्हणून असे टोलनाका चालवणाऱ्या खासदारांनी मला शहाणपणा शिकवू नये अशा शब्दात आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उदयनराजे भोसले यांच्यावर खरमरीत शब्दात टीका केली आहे.

नेमकं काय म्हणाले शिवेंद्रसिंहराजे भोसले?
शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, हे आम्हाला म्हणतात की हे असे लोकं कसे काय छत्रपतींच्या घराण्यात जन्माला आले. माझं सोडा पण टोलनाके चालवणारे हे कस काय छत्रपतींच्या घराण्यात जन्मली हेच काळात नाही. हे छत्रपतींच नाव सांगतात व टोलनाके चालवतात, तिथे लोकांना दमदाटी करून मारहाण करतात. तुमच्या टोलनाक्याचं अर्थकारण सगळ्या जिल्ह्याला माहिती आहे. टोलनाके कोणाच्या मेहरबानीने चालतात. कोणाचे काय लागेबांधे आहे. त्यामुळे अशा टोलनाके चालवणाऱ्या खासदारांनी मला शहाणपणा शिकवू नये असे शिवेंद्रसिंहराजे म्हणाले.

तसेच पुढे बोलताना ते म्हणाले, काहींची डायलॉगबाजी ही साताऱ्यातील जनतेला पाठ झाली आहे. उगाच इकडे या, हे सिद्ध करा नाहीतर मिशा काढतो ते फक्त अशी डायलॉगबाजीच करू शकतात. मात्र आजवर त्यांनी दिलेले चॅलेंज कधी पूर्ण काही केले नाही.

तुम्हाला जिल्हा बँकेत संचालक म्हणून यायचे होते. तुमची जिल्हा बँकेत संचालक होण्याची ताकद नव्हती, तेव्हा तुम्ही माझ्या घरी येऊन मला मदत मागितली होते हे विसरलात का? तुम्हाला राजकीय ताकद हवी होती तेव्हा तुम्ही माझ्याजवळ मदत मागायला आला. असा मार्मिक टोलाही आ.शिवेंद्रसिंहाराजे यांनी उदयनराजेंना पत्रकार परिषदेत लगावला.

मुख्यमंत्र्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सावरकरांचा फोटो

स्वतःचा नाकर्तेपणा लपवायचा असल्यानेच त्यांची खोटी डायलॉग बाजी सुरू असून खोटारड्या डायलॉग बाजींचे तुणतुणे वाजवणे बंद करा. जनता तुम्हाला यंदाच्या नगरपालिका निवडणुकीत नारळ देणार असल्याची घणाघाती टीका आ.शिवेंद्रसिंहाराजें यांनी खा.उदयनराजेंवर केली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube