मुख्यमंत्र्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सावरकरांचा फोटो

मुख्यमंत्र्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सावरकरांचा फोटो

मुंबई : सध्या राज्यासह देशात सावरकर यांच्यावरून वाद सुरु आहे. राहुल गांधींकडून सावरकरांचा विरोध केला जातो आहे तर दुसरीकडे भाजप सावरकरांच्या समर्थनार्थ काँग्रेसचा निषेध करत आहे. आता याच मुद्द्यावरून राज्यात भाजपने देखील आक्रमक भूमिका घेतली आहे. सावरकरांच्या समर्थनार्थ राज्यभरात सावरकर गौरव यात्रा ( Savarkar Gaurav Yatra) सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केली आहे. तर नुकताच मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रोफाईल फोटो म्हणून सावरकरांचा फोटो टाकला आहे.

मुख्यमंत्र्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील फोटो बदलले
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर (Vinayak Damodar Savarkar) यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी त्यांचे सोशल मीडिया खाते अपडेट केले आणि सावरकरांची छायाचित्रे ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्रामवर प्रोफाइल म्हणून ठेवली आहेत.

सावरकर यांच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. माझे नाव गांधी आहे सावरकर नाही, म्हणून मी माफी मागणार नाही असे वक्तव्य राहुल गांधी यांनी केले. यावरून राज्यातील राजकारण पेटले आहे. याचे पडसाद राज्यात देखील उमटू लागले आहे. यावरून राज्यातील भाजप – शिवसेना सरकार देखील आक्रमक झाले आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत महाराष्ट्रात ‘सावरकर गौरव यात्रा’ काढणार असल्याचेही जाहीर केले.

मंत्री आठवले म्हणाले… तेव्हा जनताच राहुल गांधीनां धडा शिकवेल

यावेळी बोलताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मी राहुल गांधी यांनी वीर सावरकरांबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध करतो. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी मोठी भूमिका बजावली. अशा वीरांच्या योगदानामुळेच भारताला स्वातंत्र्य मिळाले. आम्ही राज्यात सावरकर गौरव यात्रा काढणार आहोत, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

खासदारकी गेली आता सरकारी बंगलाही जाणार…राहुल गांधींच्या अडचणीत वाढ

‘सावरकर गौरव यात्रे’विषयी अधिक माहिती देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, वीर सावरकरांच्या योगदानाबद्दल बोलण्यासाठी आम्ही राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात सावरकर गौरव यात्रा काढणार आहोत. त्यासोबतच सावरकरांचा अपमान करणाऱ्यांचा निषेध करू.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube