खासदारकी गेली आता सरकारी बंगलाही जाणार…राहुल गांधींच्या अडचणीत वाढ

खासदारकी गेली आता सरकारी बंगलाही जाणार…राहुल गांधींच्या अडचणीत वाढ

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या अडचणीत भर घालणारी माहिती समोर आली आहे. राहुल गांधी यांना आता लोकसभेच्या गृहनिर्माण समितीने सरकारी बंगला खाली करण्याची नोटीस बजावली आहे. राहुल गांधी हे 12 तुघलक लेन येथील सरकारी बंगल्यात राहतात. त्यांना 22 एप्रिलपर्यंत सरकारी बंगला खाली करावा लागणार आहे. नोटीसनुसार, अपात्रतेनंतर एक महिन्याच्या आत राहुल गांधी यांना त्यांचे अधिकृत निवासस्थान रिकामे करावे लागेल. यामुळे पुन्हा एकदा त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

राहुल गांधी ‘या’ ठिकणी राहतात
राहुल गांधी हे 2004 मध्ये लोकसभा खासदार म्हणून निवडून आले त्यांनतर त्यांना 12, तुघलक लेन बंगला देण्यात आला. मात्र आता त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे, यामुळे त्यांना आता हा सरकारी बंगला रिकामा करावा लागणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राहुल गांधींना 22 एप्रिलपर्यंत बंगला रिकामा करण्यास सांगण्यात आले आहे.

बाहेरच्या राज्यातील कोणी आमच्या इथं नाक खुपसू नये, विखेंचा तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना टोला

काही दिवसांपूर्वी राहुल यांनी ‘मोदी’ या आडनावावर केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी कोर्टाने त्यांना दोषी ठरवत त्यांच्यावर दोन वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. यानंतर राहुल गांधी यांना लोकसभेच्या सदस्यत्वासाठी अपात्र ठरवण्यात आले. हे सगळं सुरु असताना आता मात्र त्यांना सरकारी बंगला देखील खाली करण्याची नोटीस देण्यात आली आहे.

मंत्री आठवले म्हणाले… तेव्हा जनताच राहुल गांधीनां धडा शिकवेल

कारवाईवर राहुल गांधी म्हणाले…
मी संसद सदस्य राहू अथवा नाही राहो, मला तुरुंगात टाकले तरी लोकशाहीसाठी मी लढत राहणार. आपण घाबरत नाही आणि माफी मागणार नाही. कारण माझे नाव गांधी आहे, सावरकर नाही आणि गांधी माफी मागत नाहीत, असेही ते म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube