Gujarat Bridge Collapse : गुजरातमधून मोठी बातमी समोर येत आहे. बनासकांठा जिल्ह्यातील निर्माणाधीन पूल कोसळून (Gujarat Bridge Collapse) मोठी दुर्घटना झाली. या घटनेत ओव्हरब्रिजचा काही भाग कोसळला. पाच गर्डस एकाच वेळी खाली कोसळले. या घटनेत दोघा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. या अपघाताची गुजरात सरकारने गंभीर दखल घेतली असून मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. यानंतर पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी मदतकार्य सुरू केले आहे. या ढिगाऱ्याखाली आणखी काही जण दबले आहेत त्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Uddhav Thackeray : ‘शिवसेना तोडली, राष्ट्रवादीने फोडली अन् मिंध्या लाचारांच्या’.. ठाकरे गटाचा घणाघात
बनासकांठा जिल्ह्यातील पालनपूर येथील आरटीओ सर्कल येथे पुलाचे बांधकाम सुरू आहे. बांधकाम सुरू असतानाच या पुलाचा काही भाग अचानक खाली कोसळला. त्यामुळे पळापळ सुरू झाली. यातच पुलाखाली उभ्या असलेल्या रिक्षा आणि ट्रॅक्टर ट्रॉलीची धडक झाली. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस यंत्रणा आणि बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली. त्यांच्याकडून मदतकार्य सुरू करण्यात आले. पूल कोसळल्याचा मोठा आवाज आला. त्यानंतर आजूबाजूचे लोक चांगलेच घाबरले. या घटनेच्या चौकशीचे आदेश स्थानिक प्रशासनाला देण्यात आले आहेत.
#WATCH गुजरात के पालनपुर में निर्माणाधीन पुल का एक हिस्सा गिर गया।
अधिक जानकारी की प्रतीक्षा है। pic.twitter.com/f2zyqQ3P36
— ANI_HindiNews (@AHindinews) October 23, 2023
या घटनेवर राजकारणही सुरू झाले आहे. राज्यातील विरोधी पक्ष काँग्रेसने भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. काँग्रेस नेते अमित चावडा यांनी सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप केला. पालनपूर आरटीओ सर्कलजवळील ओव्हरब्रिज कोसळला. या पुलाच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाला आहे. आता पुन्हा अधिकारी बदलले जाणार फक्त इतकेच होणार आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
मोदींच्या सभेला गर्दी गोळा करण्याची सक्ती का? बाळासाहेब थोरात यांचा सवाल