गुरिंदरवीर सिंह देशातील सर्वाधिक वेगवान धावपटू! दोन मिनिटात राष्ट्रीय विक्रम मोडले

Gurindervir Singh-पुरुषांच्या 100 मीटर शर्यतीत अवघ्या 10.09 सेकंदांचा वेळ नोंदवत नवा राष्ट्रीय विक्रम आपल्या नावावर केलाय.

Gurindervir Singh

Gurindervir Singh

Gurindervir Singh: भारताचा धावपटू गुरिंदरवीर सिंह याने राष्ट्रीय अॅथलेटिक्समध्ये (National Athletics) नवा इतिहास रचलाय. 25 वर्षीय गुरिंदरवीरने पुरुषांच्या 100 मीटर शर्यतीत अवघ्या 10.09 सेकंदांचा वेळ नोंदवत नवा राष्ट्रीय विक्रम आपल्या नावावर केलाय. यामुळे तो 10.10 सेकंदांच्या आत 100 मीटर धावणारा पहिला भारतीय धावपटू ठरलाय.(Gurinderveer Singh, the fastest runner in the country)


काही मिनिटात दोनदा मोडला राष्ट्रीय विक्रम

रांचीतील राष्ट्रीय वरिष्ठ अॅथलेटिक्स फेडरेशन स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी
ओडिशाच्या अनिमेष कुजूरने 10.18 सेकंदांचा राष्ट्रीय विक्रम
सेमीफायनलमध्ये गुरिंदरवीरने 10.17 सेकंद वेळ नोंदवत हा विक्रम मोडला
पाच मिनिटांत अनिमेषकडून 10.15 सेकंद वेळ काढत पुन्हा राष्ट्रीय विक्रम नावावर
——————–
फायनलमध्ये गुरिंदरवीरची दमदार बाजी
फायनलमध्ये गुरिंदरवीरकडून 10.09 सेकंदात शर्यत पूर्ण
अनिमेषपेक्षा 0.11 सेकंद कमी घेत वेग घेत विक्रम नोंदविला
रिलायन्स फाउंडेशनचा प्रणव गुरव 10.29 सेकंदांसह तिसऱ्या स्थानावर
———————
आशियातील दुसऱ्या क्रमांकाचा वेगवान वेळ
गुरिंदरवीरचा यंदाचा आशियातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोत्तम वेळ
जपानच्या Fukuto Komuro च्या नावावर 10.08 सेकंद वेळ
———————-
राष्ट्रकुल स्पर्धेसाठी पात्रता
गुरिंदरवीरने 2026 राष्ट्रकुल स्पर्धेची 10.16 सेकंदांची पात्रता वेळही पार
तो आगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी भारताचा मोठा दावेदार
——————-
कोण आहे गुरिंदरवीर सिंह?
गुरिंदरवीर सिंह उदयोन्मुख ट्रॅक अँड फील्ड स्टार
शॉर्ट स्प्रिंट प्रकारात विशेष प्राविण्य मिळवलेला धावपटू
पंजाबमधील जालंधर जिल्ह्यातील पत्याल गावचा रहिवासी
सहावीत असतानाच अॅथलेटिक्सची सुरुवात
वडिल कमलजीत सिंह पंजाब पोलिस दलात
जालंधरमधील प्रशिक्षक सरबजीत सिंह हॅपी यांच्याकडून मार्गदर्शन घेतले.
गुरिंदरवीर सिंहने अनेक स्पर्धांमध्ये पदके जिंकली
——————-
जागतिक विक्रम कुणाच्या नावावर?
जागतिक विक्रम दिग्गज जमैकाचा धावपटू उसेन बोल्टच्या नावावर
जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत 9.58 सेकंद वेळ नोंदविला

Exit mobile version