रेस ट्रॅकचा ‘अल्फा’! भारतातील सर्वात वेगवान धावपटू बनल्यानंतर गुरिंदरवीर सिंगची पहिली मुलाखत

‘Alpha’ of Race Track ‘अल्फा’ ची उत्सुकता वाढत असतानाच, आलिया भट्ट हिने भारताचा नवा ट्रॅक सुपरस्टार गुरिंदरवीर सिंग याच्याशी खास संवाद साधला.

‘Alpha’ Of Race Track

‘Alpha’ of Race Track! Gurindervir Singh’s first interview after becoming India’s fastest runner : यश राज फिल्म्सच्या बहुप्रतीक्षित ‘अल्फा’ चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढत असतानाच, चित्रपटाची प्रमुख अभिनेत्री आलिया भट्ट हिने भारताचा नवा ट्रॅक सुपरस्टार गुरिंदरवीर सिंग याच्याशी खास संवाद साधला. नुकताच 10.09 सेकंदांचा वेळ नोंदवत इतिहास रचणारा गुरिंदरवीर भारतातील सर्वात वेगवान धावपटू ठरला आहे.या मनमोकळ्या आणि भावनिक संवादात गुरिंदरवीरने आपल्या आई-वडिलांच्या पाठिंब्याबद्दल, वडिलांच्या अपूर्ण क्रीडा स्वप्नांमधून मिळालेल्या प्रेरणेबद्दल आणि खेळ सोडण्याचा विचार करावा लागलेल्या कठीण काळाबद्दल खुलासा केला.

दिलासा! मान्सून पुण्यात दाखल, 48 तासांत मुंबईत दाखल होणार हवामान विभागाकडून मोठी अपडेट

संवादाची सुरुवात करत गुरिंदरवीर म्हणाला, “सगळ्यांच्या पुढे आणि सर्वात वेगवान होण्यासाठी फोकस, जिद्द आणि हार्ड वर्क लागतो. रेडी?” यावर आलिया म्हणाली, “आज माझ्यासोबत आहेत भारताचा अभिमान, 10.09 सेकंदांचा ऐतिहासिक विक्रम करणारे, रनिंग ट्रॅकचे खरे ‘ऐल्फा’ गुरिंदरवीर सिंग. तुम्ही कधी ठरवलं की तुम्हाला भारतातील सर्वात वेगवान धावपटू बनायचं आहे?”

https://www.instagram.com/reel/DZ4GMUvMnYM/

…म्हणून ओमराजेंनी घेतला शिंदे गटात जाण्याचा निर्णय; तानाजी सावंतांनी सांगितलं कारण

गुरिंदरवीरने आपल्या बालपणीच्या आठवणी सांगताना म्हटले, “वडिलांच्या ट्रॉफीज आणि मेडल्स मी नेहमी स्वच्छ करत असे. त्यांचा व्हॉलीबॉल खेळतानाचा एक फोटो होता. तो पाहून मीही एक दिवस तसं काहीतरी करायचं ठरवलं. नंतर उसैन बोल्टचा वर्ल्ड रेकॉर्ड पाहिला आणि एथलेटिक्समध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला. वडिलांनी सांगितलं होतं की यासाठी खूप मेहनत लागेल, पण मी तयार होतो.”

ब्लॉकबस्टर चित्रपट तुंबाडची मंजुळा! दोन आठवड्यांत पार केला 15 कोटींचा टप्पा!

आलियाने त्यांच्या वडिलांच्या दुखापतीबद्दल विचारले असता गुरिंदरवीर म्हणाला, “वडिलांना व्हॉलीबॉल खेळताना दुखापत झाली होती आणि त्यांना खेळ सोडावा लागला. ते अनेकदा म्हणायचे की जर खेळ सुरू ठेवला असता तर आज आयुष्य वेगळं असतं. तेच त्यांचं स्वप्न नंतर माझं स्वप्न बनलं. रेस जिंकल्यानंतर मी सर्वात आधी त्यांनाच फोन केला आणि विचारलं, ‘डॅडी, आता कसं वाटतंय?’ ते म्हणाले, ‘खूप मजा आली.’”

आधी भाजपला मतदान, मग शिंदे गटात प्रवेश! ओमराजे निंबाळकरांनी महाविकास आघाडीला दगा दिला का?

त्यांच्या सुरुवातीच्या प्रवासात वडिलांच्या भूमिकेबद्दल बोलताना गुरिंदरवीर म्हणाला, “ते इतके समर्पित होते की त्यांनी स्वतःसाठी कधीच काही घेतलं नाही. कामावरून आल्यानंतर ते माझ्यासाठी जेवण बनवत असत. माझे सर्वात आवडते शेफ म्हणजे माझे वडील. माझे पहिले स्पाइक्सही त्यांनी न्यूझीलंडमधून आणले होते. मी ते जमिनीवर ठेवूही देत नव्हतो.”

विधान परिषद निवडणुकीत महायुतीचा दणदणीत विजय; 17 पैकी 16 जागांवर सरशी, नाशिकमध्ये गोकुळ गितेंनी दिला धक्का

2024 मधील कठीण काळाबद्दल बोलताना तो म्हणाला, “अशी वेळ आली होती की मी वडिलांना सांगत होतो की कदाचित आता हे शक्य होणार नाही. ते म्हणाले की घरी परत ये, दुसरं काही करू. पण त्यावेळी माझ्या आईने आम्हा दोघांना धीर दिला. तिने सांगितलं की देवावर विश्वास ठेवा, हा कठीण काळही निघून जाईल.”

नाशिकमध्ये महायुतीला मोठा धक्का, अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांच्याकडून महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचा पराभव

2025 मधील बदलांविषयी विचारल्यावर गुरिंदरवीर म्हणाला, “मी रिलायन्स फाउंडेशनमध्ये सामील झालो आणि मला हवी असलेली प्रत्येक गोष्ट तिथे मिळाली — उत्कृष्ट प्रशिक्षण, उत्तम वातावरण, योग्य आहार आणि जागतिक दर्जाच्या सुविधा. हे फाउंडेशन सुरू केल्याबद्दल मी नीता अंबानी मॅडमचे आभार मानतो.”

follow us