Download App

Hariyana Violence : नूहची तीन दशकांच्या शांततेचा भंग! लोकांनी खिडक्या, दारं बंद करुन जीव मुठीत धरला

Hariyana Violence : हरियाणामधील नूहमध्ये तब्बल 3 दशकानंतर पुन्हा एकदा हिंसाचार उफाळून आला आहे. बजरंग दल आणि विश्व हिंदु परिषदेने काढलेल्या जलाभिषेक यात्रेदरम्यान हा हिंसाचार घडला. यात दोन होमगार्ड जवानांचा मृत्यू झाला असून 24 जण जखमी झाले आहेत.

दरम्यान या हिंसाचारामुळे शहरातील लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घराचे दरवाजे आणि खिडक्याही बंद करुन जीव मुठीत धरुन लोक बसल्याचं दिसून आलं. घरांमध्ये अडकलेल्या लोकांनी पोलिसांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण संपर्क होऊ शकला नव्हता.

नूहमध्ये घडलेला हा तब्बल 3 दशकानंतरचा हिंसाचार आहे. यापूर्वी अयोध्येतील राम मंदिराच्या मुद्द्यावरुन हिंसाचार घडला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा नूहमध्ये हिंसाचार घडल्याचं पाहायला मिळालं आहे.

सत्ता येते अन् जाते पण समाज, देश इथेच राहतो; पंतप्रधान मोदींचा मराठीतून टोमणा…

 

नेमकं काय घडलं?

मोनू मानेसर हा मागील अनेक वर्षांपासून हिंदुत्ववादी संघटनेत काम करतो. बजरंग दलाच्या माध्यमातून त्याने मोठं संघटन उभं केलं. गोरक्षण आणि गोरक्षकांसाठी कार्यकर्त्यांसह त्याने आत्तापर्यंत महत्वाची भूमिका बजावली आहे. 2019 साली गो-तस्करांचा पाठलाग करताना त्याच्यावर बेछूट गोळीबार करण्यात आला होता. या गोळीबारामध्ये तो जखमी झाला होता.

रुग्णालयातून उपचार घेऊन ठणठणीत बरा झाल्यानंतर त्याने गो-संवर्धनाचं काम सुरुच ठेवलं होतं. त्यानंतर राजस्थानमधील भिवानी येथे जुनैद-नासीर या दोघांनाही गाडीत जिवंत जाळल्याप्रकरणी मोनू मानेसरचे नाव चर्चेत आलं होतं. या घटनेनंतर मोनूने व्हिडिओ प्रकाशित करून त्याच्या हत्येशी संबंध नसल्याचं सांगितलं होतं. मात्र तेव्हापासूनच मोनू मानेसर हा नसीर-जुनेद हत्याकांडात वॉण्टेड होता.

लोकसभेत उद्या INDIA ची अग्निपरीक्षा; केंद्र सरकार आणणार अध्यादेश

गुरुग्रामजवळील नूह परिसरात विश्व हिंदु परिषदेद्वारे बृजमंडळ जलाभिषेक यात्रेचं आयोजन करण्यात आलं. या यात्रेला हजेरी लावणार असल्याचं मोनू मानेसरने घोषित केलं होतं. यासंदर्भातील व्हिडिओच प्रकाशित करण्यात आला होता. मोनूच्या घोषनेनंतर या यात्रेत अनेकांनी त्याला पाहिल्याचा दावा केला आहे. या यात्रेदरम्यान एका टोळीकडून अचानक यात्रेवर दगडफेक करण्यात आली. त्यानंतरच हिंसाचार उफाळून आला.

अयोध्या राम मंदिर आंदोलनादरम्यान नूहमध्ये हिंसाचार झाला होता. त्यानंतर तीन दशके नूहमध्ये पूर्ण शांतता होती. मागील वर्षी मिरवणुकीत काही संघटनांनी धार्मिक स्थळाची तोडफोड केल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर कोणतीही घटना घडली नव्हती मात्र, कालच्या हिंसाचारामुळे तीन दशकांची शांतता भंग झाली आहे.

दरम्यान, नूहमधील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस प्रशासनाकडून शांतता बाळगण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. समाजमाध्यमांवर धार्मिक भावना दुखावण्यासंबंधी पोस्टवर पोलिसांची करडी नजर असणार आहे. तसेच समाजात बंधुभाव टिकवण्याचं आवाहन पोलिस उपायुक्त निशांत कुमार यांनी केलं आहे.

Tags

follow us