Download App

हरियाणात भाजप-कॉंग्रेसचा सोशल इंजिनीअरिंगचा प्रयोग, 36 जागांवर एकाच जातीचे उमेदवार…

90 विधानसभा जागांपैकी 36 विधानसभा मतदारसंघात दोन्ही पक्षांनी एकाच जात समूहातील उमेदवारांनी उतरवण्याच निर्णय घेतला.

  • Written By: Last Updated:

Haryana Election: हरियाणा विधानसभा (Haryana Election) निवडणुकीची रंगत दिवसेंदिवस वाढत चालली. या निवडणुकीत सत्ताधारी भाजपसमोर (BJP) सरकार वाचवण्याचे मोठे आव्हान आहे. सत्ता काबीज करण्यासाठी भाजप आणि कॉंग्रेसमध्ये (Congress) जोरदार प्रयत्न होताहेत. यासाठी दोन्ही पक्षांकडून रणनीती आखली जात आहे. काँग्रेस सोशल इंजिनीअरिंगचा प्रयोग राबवून सत्ता स्थापनेसाठी प्रयत्नशील आहे. 90 विधानसभा जागांपैकी 36 विधानसभा मतदारसंघात दोन्ही पक्षांनी एकाच जात समूहातील उमेदवारांना उतरवण्याचा निर्णय घेतला. 14 मतदारसंघात जाट तर 15 मतदारसंघात ओबीसी उमेदवारांना प्राधान्य देण्यात आलं.

Krishna Shroff: कृष्णाने ‘खतरों के खिलाडी 14’ मध्ये ‘तिकीट टू फिनाले’च्या शर्यतीत आघाडीवर 

राज्यातील कोणताही मतदारसंघात उमेदवार निवडणूक आणण्यासाठी ओबीसी (33 टक्के लोकसंख्या), जाट (25 टक्के) आणि दलित (21 टक्के) वर्गाची महत्वाची भूमिका असते. त्यामुळं काँग्रेसने सर्वाधिक जाट उमेदवार उभे केले आहेत. तब्बल 28 जाट उमेदवारांना कॉंग्रेसने निवडणूकीच्या रिंगणात उतरले. तर भाजपने 16 जागांवर जाट उमेदवारांवर विश्वास दर्शवला.

भाजपने 22 तर काँग्रेसने 20 ओबीसींना तिकीट
भाजपने ओबीसीमधून सर्वाधिक 22 उमेदवार उभे केले आहेत, तर काँग्रेसने 20 ओबीसीं उमदेवारांनी उमेदवारी जाहीर केली. विधानसभेच्या 17 जागा अनुसूचित प्रवर्गासाठी राखीव आहेत. या व्यतिरिक्त कोणत्याही पक्षाने दलित उमेदवारांना तिकीट दिलं नाही. बल्लभगडमध्ये भाजपचे मूलचंद शर्मा आणि काँग्रेसचे पराग शर्मा यांच्यात लढत होणार आहे. तर गन्नौरमध्ये भाजपचे देवेंद्र कौशिक आणि काँग्रेसचे कुलदीप शर्मा यांच्यात सामना होणार आहे.

चार मतदारसंघात पंजाबी उमेदवारांमध्ये लढत…
चार जागांवर पंजाबी उमेदवार आमनेसामने आहेत, थाणेसरमध्ये भाजपचे सुभाष सुधा आणि काँग्रेसचे अशोक अरोरा, हांसीमध्ये भाजपचे विनोद भयाना आणि काँग्रेसचे राहुल मक्कर, पानिपतमध्ये भाजपचे प्रमोद विज आणि काँग्रेसचे वरिंदर शाह यांचा समावेश आहे. रोहतकमध्ये मंत्री मनीष ग्रोव्हर आणि काँग्रेसचे भारतभूषण बत्रा यांच्यात लढत होणार आहे.

कंवरपाल गुर्जर यांच्या विरोधात अक्रम खान लढणार…
फिरोजपूर झिरका येथे भाजपने नसीम अहमद यांना काँग्रेसच्या मामन खान यांच्या विरोधात उभे केले आहे, तर पुन्हानामध्ये भाजपने एजाज खान आणि काँग्रेसला मोहम्मद इलियास यांच्या विरोधात उभे केले आहे. जगाधरीमध्ये काँग्रेसने अक्रम खान यांना भाजपच्या कंवरपाल गुर्जर यांच्या विरोधात, नूहमध्ये काँग्रेसने आफताब अहमद यांना भाजपच्या मनोज रावत यांच्या विरोधात तर हातीनमध्ये मोहम्मद इस्रायल यांना भाजपच्या मनोज रावत यांच्या विरोधात उभे केले आहे.

 

follow us