Haryana Elections 2024 : हरियाणा विधानसभा निवडणुकीची घोषणा (Haryana Elections) झाली आहे. यंदा सत्ताधारी भाजप आणि काँग्रेसमध्ये (Congress Party) जोरदार टक्कर आहे. पण या निवडणुकीत प्रादेशिक पक्ष आणि अपक्ष उमेदवारांना मिळणारा पाठिंबा देखील तितकाच महत्त्वाचा आहे. कारण या फॅक्टरमुळे दोन्ही मोठ्या पक्ष्यांपैकी एकाचा खेळ बिघडण्याची पूर्ण शक्यता आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Elections) भाजपला मोठे नुकसान सहन करावे लागले. या वेळच्या निवडणुकीत भाजपला फक्त पाच जागा जिंकता आल्या. तर पाच जागा काँग्रेसने जिंकल्या.
सत्ताधारी पक्षाला आता असे वाटत आहे की तीन नंबरचे खेळाडू जास्त मते घेतील. बहुतांश विधानसभा निवडणुकीत असे पाहण्यास मिळते. काँग्रेस नेत्यांना वाटत आहे की राष्ट्रीय मुद्दे आणि मोदी फॅक्टरच्या गैरहजेरीत भाजपला (BJP) फटका बसू शकतो. माजी मुख्यमंत्री दुष्यंत चौटालांचा जेजेपी, इंडीयन नॅशनल लोकदल आणि बहुजन समाज पार्टी आघाडी तसेच अपक्ष उमेदवार 2019 मधील निवडणुकीत विजयी झाले होते.
भाजपसाठी हरियाणा टफ! ‘या’ तीन आव्हानांचं उत्तर शोधणं कठीणच; नवा फॉर्म्यूला काय?
दुष्यंत सिंह चौटाला (Dushyant Singh Chautala) आणि अभय सिंह चौटाला यांचा मुख्य भर जाट मतदारांवर असतो. या समाजाने लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला भरभरून मदत केली. 26% लोकसंख्येसह जाट हरियाणात (Haryana Politics) सर्वात मोठा समाज आहे. लोकसभा निवडणुकीत या मतदारांनी भाजपला जोरदार झटका दिला होता. आताही राज्यातील सत्तेचं गणित या समाजातील मतदारांवर बऱ्यापैकी अवलंबून आहे. आता विधानसभा निवडणुकीत हा समाज कुणाला साथ देणार याची उत्सुकता आहे.
प्रादेशिक पक्ष मत खाणारे पक्ष आहेत असे वक्तव्य काँग्रेस नेते भूपेंद्र सिंह हुड्डा (Bhupinder Singh Hooda) यांनी केले होते. जेजेपीला लोकसभा निवडणुकीत एक टक्क्यांपेक्षाही कमी मते मिळाली. मागील विधानसभा निवडणुकीत या पक्षाला पंधरा टक्के मते मिळाली होती आणि 10 दहा जागा जिंकल्या होत्या. आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी जेजेपी या निवडणुकीत आहे. आता त्यांच्याकडे तीनच प्रामाणिक आमदार राहिले आहेत.
Bangladesh violence: बांगलादेशातील घटनांचे महाराष्ट्रात पडसाद; शरद पवारांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया
हरियाणात विधानसभेच्या 90 जागा आहेत. काँग्रेसमध्ये गटबाजी होऊन त्याचा फायदा मिळेल अशी शक्यता भाजपला वाटत आहे. तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी कमी होते हा काँग्रेसचा अनुभव आहे. त्यामुळे काँग्रेसची चिंता वाढली आहे. सन 2014 मध्ये राज्यात भाजपने पहिल्यांदा बहुमत मिळवलं होतं. यानतंर मात्र 2019 मधील निवडणुकीत भाजपला फक्त 40 जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे सरकार बनवण्यासाठी भाजपला जेजेपी पक्षाचा पाठिंबा घ्यावा लागला होता.