Download App

हातरसच्या मुलीला मिळाला न्याय, मुख्य आरोपी संदीपला जन्मठेपेची शिक्षा

हातरस : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh)हातरस (Hathras)येथील बुलगढी येथील सामूहिक अत्याचार प्रकरणात (Hathras rape case)आज गुरुवारी हा निर्णय दिलाय. या प्रकरणात एससी-एसटी न्यायालयाचे (SC-ST Court)विशेष न्यायाधीश त्रिलोकपाल यांनी हा निकाल दिलाय. आपल्या निर्णयात त्यांनी सामूहिक अत्याचारातील तीन आरोपींची निर्दोष मुक्तता केली, तर एका आरोपीला शिक्षा झालीय.

मुख्य आरोपी संदीपला कलम 304 आणि एससी/एसटी कायद्यांतर्गत दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली. अन्य आरोपी रामू, रवी आणि लवकुश यांना हजर करण्याचे आदेश दिले आहेत. पीडितेचे वकील महिपाल सिंह यांनी ही माहिती दिलीय.

Kasba By Election : ‘चिंचवडही जिंकलं असतं पण…’ ‘राहुल कलाटेंवर अजित पवार म्हणाले

हातरस मध्ये 14 सप्टेंबर 2020 रोजी एका दलित मुलीवर काही तरुणांनी सामूहिक अत्याचार केला होता. त्यानंतर मुलीची प्रकृती बिघडल्यानं तिला दिल्लीतील सफदरगंज रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र या घटनेच्या 15 दिवसांनंतर म्हणजेच 29 सप्टेंबर रोजी पीडित मुलीचा मृत्यू झाला. त्यात SC-ST कोर्टानं गुरुवारी आपला निकाल दिलाय. न्यायालयानं आपल्या निर्णयात लव-कुश, रामू आणि रवी नावाच्या आरोपींची निर्दोष मुक्तता केलीय.

मात्र, न्यायालयानं यातील एका आरोपी संदीपला दोषी ठरवलंय. न्यायालयानं त्याला 304 आणि एससी एसटी कायद्यान्वये दोषी ठरवलंय. न्यायालयाच्या या निर्णयावर पीडितेच्या कुटुंबीयांनी आक्षेप घेतलाय. त्याचवेळी, पीडित कुटुंबीय बुलगढी न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात जाणार असल्याचं बोललं जातंय.

Tags

follow us